शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलमध्ये पडला बालक!

By admin | Updated: February 1, 2015 02:02 IST

शेतातील १५० फूट खोल बोअरवेलमध्ये अडीच वर्षीय बालक पडल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

फुलसावंगी (जि़ यवतमाळ) : शेतातील १५० फूट खोल बोअरवेलमध्ये अडीच वर्षीय बालक पडल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. ४० फूट खोलवर तो चिखलात रूतून बसला असून, त्याला बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाचे प्रयत्न सुरूच होते़ शंकर सुरज आखरे असे बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.निंगनूर येथील नईम अली रजाक अली यांच्या शेतात एक बोअरवेल खोदण्यात आली. मात्र, त्याला पाणी न लागल्याने केसिंग टाकले नाही. त्यावर पोते व तुराट्या टाकून झाकून ठेवली आहे. शनिवारी काही मजूर शेतात निंदणाचे काम करीत होते. त्यावेळी सुरज आखरे, त्याची बहीण पूजा आपल्या आईसोबत या शेतात गेले होते. शेतात खेळताना अचानक सुरज बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्याकडे गेला आणि तो त्यात कोसळला. त्याने जोराने आवाज दिल्याने सर्व मजूर व शेतमालक नईम अली धावून आले. माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदत सुरू केले. तालुका वैद्यकीय अधिकारी जब्बार पठाण यांच्या पथकाने बोअरवेलमध्ये आॅक्सिजन पुरवठा सुरू केला तर त्याला पाणी व बिस्कीट दोराच्या साहाय्याने बांधून आतमध्ये सोडण्यात आले. सुरज आतून आई-आई असा सारखा आवाज देत आहे. दरम्यान, दोन जेसीबीच्या मदतीने बोअरवेलच्या जवळ १० फूट अंतरावर खड्डा खोदून सुरजला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. उमरखेड येथून अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. उमरखेड आणि महागावचे पोलीसही घटनास्थळावर पोहोचले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरूच होते.