शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

लोकल प्रवासादरम्यान फुटली अ‍ॅसिडची बाटली

By admin | Updated: December 20, 2014 03:06 IST

रेल्वे प्रवासात अ‍ॅसिडची बाटली फुटून सहा जण जखमी झाल्याची घटना मुलुंड-ठाणे मार्गावर शुक्रवारी दुपारी १.५२ च्या सुमारास घडली

डोंबिवली : रेल्वे प्रवासात अ‍ॅसिडची बाटली फुटून सहा जण जखमी झाल्याची घटना मुलुंड-ठाणे मार्गावर शुक्रवारी दुपारी १.५२ च्या सुमारास घडली. जखमींना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रेल्वे आणि लोकलमधून ज्वलनशीन पदार्थ नेण्यास बंदी असताना हा प्रकार घडला कसा, असा सवाल आता केला जात आहे. अंबरनाथकडे जाणाऱ्या स्लो लोकलमध्ये डोंबिवलीचे नारायण शेट्टी घाटकोपर स्थानकातून चढले. मुलुंड येताच त्यांना अ‍ॅसिडची पिशवी फुटल्याचे ध्यान्यात आले़ पिशवीतून धूर बाहेर येऊ लागल्याने त्याने ती पिशवी तत्काळ बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये या सर्व प्रवाशांच्या अंगावर अ‍ॅसिडचे थेंब/शिंतोडे पडले. यात विजय वऱ्हाडकर (१९) गंभीर जखमी झाला. त्याच्या हाताला व छातीला भाजले. दिनेश सिंग (४०) आणि सरस्वती सिंग (३५) तर सुनील, सयाजी पालसे हेही जखमी झाल्याचे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस एस. एम. गोसावी यांनी सांगितले. गुन्हा दाखल होणार अ‍ॅसिड घेऊन जाणाऱ्या प्रवाशावर रेल्वेतून ज्वलनशील पदार्थ वाहून नेणे, हलगर्जीपणा करणे या कलमांखाली गुन्हा दाखल होणार आहे. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचेही ठाणे लोहमार्ग पोलिसांनी स्पष्ट केले. उपचाराचा खर्च कोण देणार?हा रेल्वेचा अपघात नसल्याने उपचार खर्चाबाबत विचार झाला नाही. तरीही विभागीय स्तरावर तसेच मुख्यालयातील अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य मंडल रेल्वे प्रबंधक डॉ. अलोक बडगूल यांनी जखमींची भेट घेतल्यानंतर सांगितले.