महाड : कर्जाची परतफेड करू न शकलेल्या महाड तालुक्यातील गावडी येथील शेतकऱ्याने विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली . ही घटना बुधवारी घडली. काशीराम मालुसरे (६२) असे त्याचे नाव आहे. त्यांनी शेतीसाठी एका राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले होते. शिवाय काहीजणांकडून उसने पैसे घेतले होते. मात्र यावर्षी फारसे पीक न आल्यामुळे ते हैराण झाले होते. मागील आठवड्यात सर्वजण झोपलेले असताना त्यांनी कीटकनाशक प्यायले. त्यांना मुुंबईतील जे. जे. रुग्णायात हलवण्यात आले. बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}