शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेल खोदल्या; पण पाणीच नाही

By admin | Updated: May 30, 2014 00:14 IST

दिवसेंदिवस पाऊस कमी होत असताना पुरेशा प्रमाणात पाणी अडवून ते जमिनीतच मुरत नसल्याने बोअरवेल कितीही खोल खोदली तरी पाणी कसे लागणार

वरपगाव : दिवसेंदिवस पाऊसकाळ कमी होत असताना पुरेशा प्रमाणात पाणी अडवून ते जमिनीतच मुरत नसल्याने बोअरवेल कितीही फूट खोल खोदली तरी पाणी कसे लागणार! हे शंभर टक्के खरे असताना शेतकरी मात्र पाणाड्यांच्या भुलथापांना बळी पडून शेकडो कूपनलिका खोदण्याचे काम करीत असून केवळ मे महिन्यात तालुक्यात शेकडो बोअरवेल खोदण्यात आल्या. मात्र पाणी न लागल्याने त्यावरील करोडोंचा खर्च फुकट गेला असून या पाणाड्यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कल्याण तालुक्याच्या दुर्गम, अतिदुर्गंम, वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तर बहुतांश गावांत एक ड्रम पाण्यासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वत:ची बोअरवेल असावी या भावनेतून शेतकरी बोअरवेल खोदण्याचा विचार करतो. मात्र शास्त्रीय पद्धतीने पाणी न शोधता आजूबाजूच्या गावांतील पाणी दाखविणारे (पाणाडे) यांच्या मागे लागून त्यांना आपला जागेतून फिरवून पाणी दाखविण्याची विनंती करतो. तालुक्यात २० ते ३० असे पाणाडे आहेत. मात्र यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याने शेतकर्‍यांची फसवणूक होते आहे, १० हजारांपासून ते २५, ५० हजारांपर्यंत कूपनलिका खोदण्यासाठी खर्च येतो. याशिवाय पाणाड्यांचा ‘मानपान’ वेगळाच. त्यामुळे इतके करूनही पाणी लागेलच याची खात्री नसल्याने शेतकरी पुरता बरबाद होतो. तर शास्त्रीय पद्धतीने जमिनीमध्ये पाणी शोधण्यासाठी जमिनीमध्ये अत्याधुनिक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे जमिनीची तपासणी केली जाते. जमिनीमध्ये सहा व्होल्ट बॅटरीच्या साहाय्याने ३०० ते १००० हजार फूट खोलीपर्यंत डी.सी. करंट सोडला जातो. या करंटच्या साहाय्याने जमिनीचा ‘रेझिस्टन्स’ मोजला जातो. त्यामुळे भूगर्भामध्ये पाणी आहे किंवा नाही ते समजते. यासाठी जमिनीच्या वरील थरावर स्टीलचे रॉड ठोकून नंतर त्यांना वायर जोडून त्या मशिनला जोडण्यात येतात. नंतर त्यात करंट सोडून रिडिंग घेण्यात येते. जमिनीची तपासणी करताना आठ दिशा लक्षात घेण्यात येतात. त्यामध्ये पाण्याचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे ते पाहिले जाते. त्यानंतर अचूक जागा निश्चित केली जाते. थोडक्यात सांगायचे तर या पद्धतीमध्ये जमिनीची कुंडलीच तयार केली जाते. विहीर किंवा बोअरवेलला किती प्रमाणात पाणी मिळेल याची साधारण कल्पना येते. या यंत्रणेद्वारे किती खोल फुटावर किती पाणी मिळेल? दिवसाला किती लीटर पाण्याचा उपसा होऊ शकतो? याचा अंदाज येतो. त्यामुळे त्यावर किती क्षमतेचा पंप बसवावा हेही निश्चित ठरवता येतो. विशेष म्हणजे एखाद्या शेतकर्‍याने पूर्वी खोदलेल्या विहीर किंवा बोअरवेल मधीलही पाण्याची दिशा ठरवता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांना व जमिनीखालील पाण्याबाबतची हमी मिळते.