शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

हावडा-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बॉम्बचा संशय

By admin | Updated: October 1, 2015 02:23 IST

अकोला रेल्वे स्टेशनवर थांबविली रेल्वेगाडी, बेवारस बॅग जप्त.

अकोला: मुंबईकडे जाणारी १२८१0 हावडा-मुंबई एक्स्प्रेस रेल्वेगाडीमधील बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयावरून जीआरपी व रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व श्‍वान पथकाने रेल्वेगाडी थांबविली आणि गाडीमध्ये तपासणी केली असता, एक बेवारस बॅग मिळून आली. परंतु त्या बॅगेत काहीच आक्षेपार्ह मिळून न आल्याने, प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. बुधवारी रायपूरनजीक रेल्वे स्टेशनजवळ हावडा-मुंबई एक्स्प्रेसमध्येच काही विस्फोटके मिळून आली होती, हे येथे विशेष. मुंबईकडे जाणार्‍या हावडा-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅग असल्याची माहिती जीआरपी व रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांना मिळाली. या माहितीनुसार, पोलिसांनी हावडा-मुंबई एक्स्प्रेस अकोला रेल्वे स्टेशनवर येताच, जवळपास अर्धा तास सर्च मोहीम राबविली. सर्च मोहिमेदरम्यान श्‍वान पथकालासुद्धा पाचारण करण्यात आले होते. एक्स्प्रेसमधील एस ११ या डब्यामध्ये बेवारस बॅग मिळून आली. श्‍वान पथकाने बॅगेची तपासणी केली असता, त्यामध्ये काहीच आक्षेर्पाह मिळून आले नाही. पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेतली आहे. बुधवारीच हावडा, छत्तीसगडमधील रायपूरनजीक रेल्वे स्टेशनजवळ मुंबई एक्स्प्रेसमध्ये घातक विस्फोटक पदार्थ मिळून आले होते. त्यानंतर ही बेवारस बॅग असल्याची माहिती समोर आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. बॉम्बच्या अफवेने अनेक प्रवाशांनी गाडी बदलली. अकोला रेल्वे स्टेशनवर केलेल्या सर्च मोहिमेदरम्यान आक्षेपार्ह मिळून आले नाही. ही सर्च मोहीम रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक राजेश बढे यांच्या मार्गदर्शनात श्‍वान पथकाचे हेड कॉन्स्टेबल रवी शेगोकार, महेंद्र मुरूमकार, मोहन येवतकर आणि जीआरपीचे एएसआय राजू पवार, प्रकाश डोंगरे यांनी राबविली.