शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता नगरसेविकेचा मृतदेह सापडला

By admin | Updated: October 3, 2015 03:52 IST

नेरूळ येथून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

नवी मुंबई : नेरूळ येथून गेल्या आठवड्यात बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मानखुर्द - गोवंडीदरम्यान रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता झाल्याच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला असून, १० दिवसांनी ही घटना उघड झाली आहे.२३ सप्टेंबरपासून प्रभाग ८८च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालदी बेपत्ता होत्या. याप्रकरणी २८ तारखेला कुटुंबीयांनी त्या मानसिक तणावात घर सोडून गेल्याची तक्रार नेरूळ पोलिसांकडे केली होती. एक महिला लोकप्रतिनिधी बेपत्ता झाल्याची शहरातली पहिलीच घटना असल्याने उपायुक्त शहाजी उमाप, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी तपासाकरिता दोन पथके तयार केली होती. या पथकाने सर्वत्र शोध घेतल्यानंतर मुंबई, नवी मुंबई व परिसरात आढळलेल्या बेवारस मृतदेहांची माहिती मिळवली. यावेळी गोवंडी येथे रेल्वेच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाला असून तिची ओळख पटलेली नसल्याचे समजले. या मृतदेहाची पाहणी करुनही पोलिसांना ओळख पटली नाही. अखेर शुक्रवारी कपड्यावरून तो मृतदेह मालदी यांचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नेरूळच्या स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहे. माजी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, पालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.अपघातानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सर्वत्र चौकशी केली होती. त्यावेळी मालदी यांच्या बेपत्ता होण्याची तक्रारच झालेली नव्हती. यामुळे त्यांचा मृतदेह बेवारस म्हणून मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात होता. अखेर दहा दिवसांनी नेरूळ पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.एप्रिल महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग ८८ मधून मालदी निवडून आल्या होत्या. तेव्हापासून प्रभागात विरोधकांच्या कुरघोडीचा त्यांना त्रास होत होता. त्यांच्या जात प्रमाणपत्रावरही विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे. तर गणेशोत्सवापूर्वी मंडप उभारणीवरून झालेल्या वादात त्यांच्यावर हल्ल्याचाही प्रयत्न झाला होता. याचा प्रचंड मनस्ताप झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.घटनेच्या दिवशी मालदी यांनी पर्स किंवा मोबाइल सोबत नेला नव्हता. यामुळे त्या गोवंडीपर्यंत पोचल्या कशा व अपघातापूर्वीचे काही तास त्या कुठे होत्या, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.चौकशीची मागणीनेरूळची महिला गोवंडीला जावून आत्महत्या करते, ही न पटणारी बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करून ही आत्महत्या आहे की हत्या याचा उलगडा करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.