शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election 2017 : शिवसेनेला रडीचा डाव खेळण्याची सवय- भाजपा

By admin | Updated: February 20, 2017 20:49 IST

महापालिकेच्या निवडणूकीत किती जागा मिळतील याचा अंदाज शिवसेना लावू शकत नाही त्यामुळे ते पराभवाच्या मानसिकतेत आहेत, सतत रडीचा डाव खेळण्याची त्यांना सवय लागली आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - महापालिकेच्या निवडणूकीत किती जागा मिळतील याचा अंदाज शिवसेना लावू शकत नाही त्यामुळे ते पराभवाच्या मानसिकतेत आहेत, सतत रडीचा डाव खेळण्याची त्यांना सवय लागली आहे. असा आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेनेवर केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ही पत्रकार परिषद नाही, पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थित केले त्यासाठी बोलत आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.  (मुंबई  महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)

प्रत्येक दिवसाला भाजपा विरोधात तक्रारी करणं हा कार्यक्रम सेनेनं राबवला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेप घेतले ,आरोप केले. मुख्यमंत्र्यांनी आचार संहिता भंग केला नाही. मुख्यमंत्री 25 वर्षे राजकारणात आहेत, संसदीय कामकाजाचा त्य़ांना तगडा अनुभव आहे. त्यामुळे काय करतो याची जाणीव आहे. तरीही त्याची शहानिशा करायला कायदा सक्षम आहे.उद्याच्या सामनाला मजकूर असावा म्हणून शिवसेना तक्रार करत असेल. संपादकीय मुलाखतीना पेड न्यूज ठरवण्याचा प्रयत्न आहे. हा पत्रकार आणि पत्रकारितेचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे. (पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: PMC Election 2017) 

दरम्यान, मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकेसाठी उद्या 21 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. महानगरपालिकेचा रणसंग्राम जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये दुमत झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षांनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या आहेत.