कुपोषितांसाठी काळा खजूर

By Admin | Updated: May 28, 2014 01:38 IST2014-05-28T01:38:25+5:302014-05-28T01:38:25+5:30

कुपोषणाच्या सॅम, मॅम श्रेणीत जिल्ह्यात सुमारे १४ हजार बालके असून त्यांना सुदृढ करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग एक कोटी रूपये

Black dates for malnutrition | कुपोषितांसाठी काळा खजूर

कुपोषितांसाठी काळा खजूर

ठाणे : कुपोषणाच्या सॅम, मॅम श्रेणीत जिल्ह्यात सुमारे १४ हजार बालके असून त्यांना सुदृढ करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग एक कोटी रूपये खुर्चून पोस्टीक असलेला काळा खजूर खरेदी करणार असून या खर्चाला जिल्हापरिषदेच्या (जि. प.) सर्वसाधारण सभेने मंगळवारी मंजुरी दिली. येथील वर्तक सभागृहात जि. प.च्या अध्यक्षा सारिका गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष इरफान भुरे यांच्यासह महिला बालकल्याण समिती सभापती सुवर्णा पाटील, राजेंद्र पानसरे, विजय पाटील , दीपा भला, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड (सीईओ), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण भावसार, जि. प. सदस्या ज्योती हिंदुराव आदींसह सदस्य वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते. आदिवासी, दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत या खजुराचा लाभ मिळविण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज व्यक्त करून अंगणवाडीतील केवळ कुपोषीत बालकांनाच न देता सर्व बालकांना या खुजराचा लाभ देण्याची सूचना जिल्हा परिषद सदस्या ज्योती ठाकरे यांनी केली. जिल्ह्यातील काही ठिकाणी या पोस्टीक पदार्थासाठी पालकांकडून दोन हजार रूपयांची मागणी केली जात असल्याची चर्चाही सभागृहात यावेळी रंगली. मात्र त्याचा जिल्हा परिषदेशी काही संबंधी नसल्याचा खुलासा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण भावसार यांनी केला. जिल्ह्यातील गावपाड्यांच्या परिसरातील गौण खजिनाचे उत्खनन केल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी त्यापोटी सुमारे चार कोटींचा निधी वाटप केल्याचा दावा जि. प. प्रशासनाने केला. पण यास हरकत घेत कोणत्या गावाना हा निधी दिला, अशी मागणी ठाकरे यांनी केली. हा निधी गटविकास अधिकार्‍यांच्या पातळीवर संबंधीत गांवाना दिला जातो. त्या गांवाची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे सीईओ गायकवाड यांनी सांगितले. राज्य शासनाकडून इयत्ता ५ वी व ८ वीच्या वर्गांना मंजुरी देण्याचे अधिकार जिपला दिले जाणार आहेत़ एक किलोमीटर अंतरावर ५ वीचा वर्ग व आठ किलो मीटर अंतरावर आठवीचा वर्ग नसलेल्या शाळांसाठी हे वर्ग मंजूर करता येणे शक्य आहे. यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Black dates for malnutrition