"तीन नापासांनी मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवलं, पण ही लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:27 PM2021-05-24T16:27:22+5:302021-05-24T16:30:11+5:30

महाविकास आघाडीमुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात, परीक्षेबाबत भूमिका स्पष्ट करा: केशव उपाध्ये

bjp spokesperson keshav upadhye slams mahavikas aghadi over ssc hsc exams in maharashtra coronavirus | "तीन नापासांनी मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवलं, पण ही लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही"

"तीन नापासांनी मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवलं, पण ही लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही"

googlenewsNext
ठळक मुद्देमहाविकास आघाडीमुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात, परीक्षेबाबत भूमिका स्पष्ट करा: केशव उपाध्येमहाविकास आघाडीनं लवकरात लवकर परीक्षांबाबत योग्य निर्णय घ्यावा, उपाध्ये यांची मागणी

"महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परिक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा," अशी मागणी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रचे  मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"कोरोना साथीमुळे राज्यात गंभीर परिस्थिती उद्भवली आहे हे जरी खरे असले तरी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे दीर्घकालीन नुकसान होणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे. उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतरही राज्य सरकारने दहावी, बारावी परीक्षांच्या  प्रश्नावर तोडगा काढला नाही. मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठीही वेळ नाही. मुळात ज्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीन तासात कोकणातला वादळ दौरा आटोपला त्या मुख्यमंत्र्यांना या परीक्षांचे महत्त्व आहे की नाही हा ही प्रश्न आहे," असं म्हणत उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

तीन नापासांनी पहिला आलेल्यांना हरवलं

"तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवले आणि राज्यात सरकार स्थापन केले. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही. तेव्हा राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. जर राज्य सरकार परिक्षा घेणार नसेल तर पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे याबाबतची स्पष्टता अजूनही सरकारने केलेली नाही. परीक्षा न घेण्याचा पर्याय सरकार निवडणार असेल ज्या-ज्या ठिकाणी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातात त्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचे काय? सरकारच्या या वेळखाऊ, धोरण लकव्यामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याचे भान या सरकारने ठेवावे," असेही ते म्हणाले.  

Web Title: bjp spokesperson keshav upadhye slams mahavikas aghadi over ssc hsc exams in maharashtra coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.