१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 01:12 PM2024-05-15T13:12:44+5:302024-05-15T13:20:07+5:30

वृषभ राशीत त्रिग्रही योग जुळून येत असून, काही राशींना शुभ फलदायी ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

मे महिन्यात वृषभ राशीत अनेकविध योग जुळून येत आहेत. मे महिन्यात वृषभ राशीत गुरु विराजमान झाला आहे. सुमारे वर्षभर गुरु वृषभ राशीत असेल. यानंतर नवग्रहांचा राजा सूर्य ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला असून, सुमारे महिनाभर सूर्य या राशीत असेल. तर काहीच दिवसांत शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे वृषभ राशीतील शुक्राचे आगमन विशेष मानले जात आहे. गुरु, सूर्य आणि शुक्र यांच्या युतीने त्रिग्रही योग जुळून येत आहे. तसेच शुक्रादित्य योगही जुळून येणार आहे. काही मान्यतांनुसार, वृषभ राशीतील अशा प्रकारचे ग्रहयोग १०० वर्षांनी जुळून येत असल्याचा दावा केला जात आहे.

गुरु आणि शुक्र एकमेकांचे शत्रू ग्रहही मानले गेले आहेत. परंतु, गुरु, सूर्य आणि शुक्र यांच्या त्रिग्रही युती योगाचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो. करिअर, व्यवसाय, नोकरी, आर्थिक आघाडीवर उत्तम फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

वृषभ: व्यक्तिमत्व सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे मिळू शकतात. करिअरला गती मिळेल. विशेषत: व्यावसायिक बाबींमध्ये अनेक नवीन सौदे मिळू शकतात. वैवाहिक जीवन छान असेल. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. अविवाहित लोकांना नवीन स्थळे येऊ शकतात.

कर्क: त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आर्थिक सुबत्ता आणि बचत होऊ शकते. नवीन जॉब ऑफर मिळू शकते. गुंतवणुकीचा फायदा होऊ शकेल.

सिंह: त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. नोकरी बदलण्याच्या अनेक नवीन संधी मिळू शकतील. प्रयत्न केल्यास आवडीची नोकरी मिळू शकेल. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. वडिलांचे सहकार्य मिळेल. गुंतवणुकीचा भविष्यात फायदा होऊ शकेल. आर्थिक समृद्धी मिळेल. पैशांची बचत होऊ शकेल.

वृश्चिक: त्रिग्रही योग लाभदायक ठरू शकेल. उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक नवीन स्रोत सापडू शकतील. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जीवनसाथी किंवा प्रियकरासह चांगला वेळ घालवतील.

मकर: त्रिग्रही योगाचा फायदा होऊ शकेल. व्यवसायात अनेक नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहिली तरी काही चढ-उतार येऊ शकतात. विचार करूनच गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.