शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाध्यक्ष अमित शहांचा मुंबई दौरा रद्द

By admin | Updated: September 25, 2014 10:06 IST

महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झाला आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ - महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच  भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा रद्द झाला आहे. महायुती टिकेल याविषयी केंद्रीय नेतृत्वाला साशंकता वाटू लागल्याने अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून महायुती संपुष्टात येणार या चर्चेचाली उधाण आले आहे. 

विधानसभा निवडणुकांसाठी अवघ्या २० दिवसांचा कालावधी उरलेला असतानाच महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना - भाजप नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महायुती अभेद्यच राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र युती टिकवण्याच्या नादात शिवसेना - भाजपने महायुतीतील लहान पक्षांचा बळी देण्याचे प्रयत्न सुरु केले. घटकपक्षांच्या जागा कमी करुन भाजपला जागा वाढवून देण्यात आल्या. मात्र राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना, शिवसंग्राम संघटना या लहान पक्षांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला.

घटक पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना - भाजपने बुधवारी रात्री उशीरापर्यंत प्रयत्न केले. मात्र यातही अपेक्षीत तोडगा निघू शकला नाही व महायुतीतील तणाव कायम राहिला. गुरुवारी भाजपाध्यक्ष अमित शहा हे मुंबई दौ-यावर येणार होते. मात्र हा दौरा गुरुवारी सकाळी अचानक रद्द करण्यात आला असून दौरा रद्द का झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शिवसेनेसोबत युती टिकेल याविषयी शंका वाटत असून दौरा रद्द होण्यामागेही हेच कारण असावे असे समजते. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेनेनेही कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिल्याची माहिती स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहुर्तावर महायुतीचा घटस्फोट होईल अशी चर्चा जोर धरु लागली आहे.