शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

"... नाहीतर तुमचीही गत साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याप्रमाणेच व्हायची"; भाजपचा राऊतांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 4:59 PM

राऊतांनी दिलं होतं सरसंघचालकांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर. "तुम्ही सत्ता टिकवण्याचं बघा आणि हो २०२४ च्या लोकसभेत शिवसेनेचे किमान खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. नाहीतर तुमचीही गत..;" भाजपचा राऊतांना निशाणा

अखंड भारताबाबत सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. "येणाऱ्या २० ते २५ वर्षांत भारत अखंड भारत होईल. पण आपण थोडे प्रयत्न केले, तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षांतच साकार होईल. याला रोखणारं कुणीही नाही. जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील. एवढेच नाही, तर सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे," असंही ते म्हणाले होते. यावर राऊत यांनी प्रत्युत्तर देत ते १५ वर्षांत नाही तर १५ दिवसांत करा असं म्हटलं होतं. यावरून भाजपनं आता राऊतांवर निशाणा साधलाय.

भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊत यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. "सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपण प्रयत्न केल्यास १०-१५ वर्षात अखंड भारताचं स्वप्न साकार होईल असं विधान केलं. त्यावर भाजपाची कावीळ झालेले संजय राऊत यांनी १५ वर्ष नव्हे तर १५ दिवसांत अखंड हिंदुस्तानचं स्वप्न साकार करू असं वचन द्या असं विधान केलं. अहो राऊतसाहेब, सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व सोडलेच आहे हे वारंवार सिद्ध का करताय?," असा सवाल उपाध्ये यांनी केला."२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसारखे कणखर नेतृत्व लाभलं तर देश कराचीतही भगवा फडकवेल असं विधान तुम्ही जाहीर व्यासपीठावरून केले होते. मोदींच्या नावावर मतं मागून शिवसेनेने १८ खासदार निवडून आले. विधानसभेतही मोदी नावाचा जप राऊत करतच होते. परंतु सत्तेसाठी भ्रष्ट्रवादींसोबत आघाडी करावी लागली. बरं ते अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. तुम्ही सत्ता टिकवण्याचं बघा आणि हो २०२४ च्या लोकसभेत शिवसेनेचे किमान खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. नाहीतर तुमचीही गत साडे तीन जिल्ह्याच्या नेत्याप्रमाणेच व्हायची," असं म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना