एक गोष्ट लक्षात ठेवा...!; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी दिलं असं उत्तर

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 28, 2021 06:02 PM2021-02-28T18:02:52+5:302021-02-28T18:05:54+5:30

हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राठोड यांचा हा राजीनामा यायला हवा होता. ज्या प्रकारचे संपूर्ण पुरावे या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते एवढे भयानक आहेत, की अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणे चुकीचे होते. मात्र... (BJP leader Devendra Fadnavis replied to the question regarding Dhananjay Munde's resignation)

BJP leader Devendra Fadnavis replied to the question regarding Dhananjay Munde's resignation | एक गोष्ट लक्षात ठेवा...!; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी दिलं असं उत्तर

एक गोष्ट लक्षात ठेवा...!; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी दिलं असं उत्तर

Next
ठळक मुद्देहे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा होता - फडणवीसअशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणे चुकीचे होते - फडणवीसत्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? अजूनही एफआयआर त्यांनी केलेला नाही - फडणवीस

मुंबई - पूजा राठोड आत्महत्या प्रकरणानंतर आज शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात बोलताना, हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. याच वेळी, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठीही अशीच भूमीका घेणार का, असे विचारले असता, भाजप आक्रमक आहे आक्रस्ताळा नाही, असे उत्तर फडणवीस यांनी दिले आहे. (BJP leader Devendra Fadnavis replied to the question regarding Dhananjay Munde's resignation)

हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राठोड यांचा हा राजीनामा यायला हवा होता. ज्या प्रकारचे संपूर्ण पुरावे या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते एवढे भयानक आहेत, की अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणे चुकीचे होते. मात्र, कुठे तरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, असे वाटल्याने आणि ते दिसत असल्याने हा राजीनामा आला नाही. जरी हा राजिनामा आला असला तरी, तो स्वीकारला आहे, की नाही हे आम्हाला माहीत नाही, असे फडणवूस यांनी म्हटले आहे. 

"आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे, सरकारचं तेलही गेलं अन्..."; भाजपचा उद्धव सरकारवर थेट निशाणा

याच बरोबर, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? अजूनही एफआयआर त्यांनी केलेला नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जे पोलीस अधिकारी करत आहेत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी केला आहे. 

यावेळी, भाजपने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी ज्या पद्धतीने लावून धरली, त्याच पद्धतीने आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा येईपर्यंत भाजप आगामी अधिवेशनात आक्रमकपणे भूमिका मांडणार का? असा प्रश्न विचारला असता,  “अशा प्रकारच्या जेवढ्या घटना असतील त्या सगळ्या प्रकरणात आम्ही आक्रमक भूमिका मांडणार. पण एक लक्षात ठेवा, भाजप आक्रमक आहे. आक्रस्ताळा नाही. वस्तूस्थितीच्या आधारवर भाजप आंदोलन करत राहील,” असे फडणवीस म्हणाले.

Pooja Chavan Suicide Case: "अधिवेशनाच्या तोंडावर कुंभकर्ण जागा झाला”; भाजपा आमदाराची बोचरी टीका

सरकारचा खरा चेहराही समोर आला - 
"आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे सरकारचं तेलपण गेलं, तुप पण गेलं, अशा स्वरूपाचा आहे. 15 दिवसांपूर्वीच राजीनामा घेतला असतां तर @OfficeofUT यांच्या बदद्ल ते संवेदनशील आहेत, हे पटल असतं. मात्र त्यांनी इतके दिवस लोकक्षोभ होईपर्यंत गप्प बसणं यातच त्यांची सत्ताअपरिहार्यता दिसून येते. म्हणूनच आता राजीनाम्याने राठोड गेले, पण सरकारचा खरा चेहराही समोर आला. सरकारच्या हाती असंवेदनशीलतेचं धुपाटण राहिलं. पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी भाजपचा संघर्ष सुरूच राहिल." असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील

 

...तर विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही -
राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला होता. एवढेच नाही, तर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला.

 

Web Title: BJP leader Devendra Fadnavis replied to the question regarding Dhananjay Munde's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.