शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

“शिवसेनेची टीम लूटमार करतेय, ही आहे ठाकरे सरकारची ‘महान’ ११”; भाजपचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 3:46 PM

भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडत, ठाकरे सरकारची महान इलेव्हन अशी यादीच दिली आहे.

मुंबई: गेल्या काही काळापासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ कंपन्यांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत.  मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या. या कारवाईचे भाजपने स्वागत केले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडत, ठाकरे सरकारची महान इलेव्हन अशी यादीच दिली आहे. (bjp kirit somaiya criticised cm uddhav thackeray govt and shivsena over ed raids on bhavana gawali)

“आता पळपुटेपणा न करता हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा”; नितेश राणेंचा टोला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत ठाकरे सरकारची महान इलेव्हन असे लिहीत खाली ११ जणांची नावे लिहिली आहेत. यामध्ये प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर यांची नावे लिहिण्यात आली आहेत. यानंतर ईडीने केलेल्या कारवाईचे स्वागत करत किरीट सोमय्या यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

“योग्य वेळ आली की सीडी लावणार”; एकनाथ खडसेंनी दिला थेट इशारा

शिवसेनेची टीम लूटमार करतेय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करतेय, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. भावना गवळीच्या टीमने १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे. १८ कोटी रुपये रोख भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून काढले आहेत आणि ७ कोटींची चोरी झाल्याचे असे प्रकार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त एवढेच काम करत आहे. भावना गवळींच्या विविध संस्थांची चौकशी सुरु आहे. ईडीच्या या कारवाईचे स्वागत करत आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, यापूर्वी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी वाशिम पोलिस ठाण्यात कार्यालयातून ७ कोटी रुपयांची रक्कम पहाटे ५ वाजता चोरीला गेल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवालाची नोंद केली. खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे ५ वाजता ₹ ७ कोटी रोख नगदी चोरी? शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत ७/७/२०१९ रोजी सकाळी ५ वाजता ₹ ७ कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली. एवढी रोख रक्कम आली कुठून?, असा मार्मिक सवाल ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणKirit Somaiyaकिरीट सोमय्याBhavna Gavliभावना गवळीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय