“उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”; भाजपचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 11:04 PM2021-09-06T23:04:29+5:302021-09-06T23:05:36+5:30

परिवहन मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती खरमाटे यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

bjp kirit somaiya alleged that 12 ministers including uddhav thackeray committed big scams | “उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”; भाजपचा इशारा

“उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”; भाजपचा इशारा

Next

सांगली: अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा नंबर असल्याचा मोठा दावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे. सोमय्या यांनी बजरंग खरमाटे यांच्या सांगली आणि तासगावमधील मालमत्तांची पाहणी केली. त्यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती खरमाटे यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. (bjp kirit somaiya alleged that 12 ministers including uddhav thackeray committed big scams)  

“शेतकरी थकतील हा केंद्रातील मोदी सरकारचा गैरसमज”; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

आरटीओ अधिकारी खरमाटे हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी खरमाटे यांच्या सांगतीलील मालमत्तांची पाहणी केली आणि पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला थेट इशाराच दिला आहे. बजरंग खरमाटे यांची तब्बल ७५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचा पगार ७० हजार आहे. मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली, अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

“अनिल देशमुख गायब का आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा”; भाजपची मागणी

उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार

सोन्या, चांदीची दुकाने, प्रथमेश पाईप फॅक्ट्री खरमाटे यांची आहे. प्रथमेश हे खरमाटे यांच्या मुलाचे नाव असून त्याच्या नावानं अनेक उद्योग आहेत. ही संपत्ती कुणाची आहे कळत नाही. अनिल परब यांच्या सचिवाची एवढई संपत्ती कशी? मग मंत्रिमहोदयांची किती असेल, असा सवाल करत ठाकरे सरकारची लूट, बेनामी कारभारात अजून एक नाव आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे १९ बेनामी बंगले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार हे बेनामी सरकार आहे. ठाकरे यांचे इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. 

“…तर तालिबानने जावेद अख्तर यांना चौकात फटके मारले असते”; भाजपचे टीकास्त्र

दरम्यान, आम्ही ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही घोटाळे केले असतील तर चौकशी करा. अनिल परब प्रकरण आता सुरु आहे, भावना गवळी पुढच्या आठवड्यात आणि जितेंद्र आव्हाड तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्हीही बॅग भरा, असे किरीट सोमय्या म्हणाले.
 

Web Title: bjp kirit somaiya alleged that 12 ministers including uddhav thackeray committed big scams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.