Ajit Pawar: “अजित पवारांच्या प्रसिद्धीवर ६ कोटींची खैरात, हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल” 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 12:19 PM2021-05-13T12:19:39+5:302021-05-13T12:21:04+5:30

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ठाकरे सरकार ६ कोटी खर्च करणार असून, बाहेरील एजन्सीवर याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

bjp atul bhatkhalkar criticises thackeray govt on deputy cm ajit pawar social media expenses | Ajit Pawar: “अजित पवारांच्या प्रसिद्धीवर ६ कोटींची खैरात, हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल” 

Ajit Pawar: “अजित पवारांच्या प्रसिद्धीवर ६ कोटींची खैरात, हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल” 

Next
ठळक मुद्देअजित पवारांच्या प्रसिद्धीवर ६ कोटींची खैरातहे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेलभाजप नेते अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र

मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढत चालला आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. यातच कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीतही राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. कारण उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रसिद्धीसाठी सरकार सहा कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून आता भाजपने ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. (bjp atul bhatkhalkar criticises thackeray govt on deputy cm ajit pawar social media expenses)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ठाकरे सरकार ६ कोटी खर्च करणार असून, बाहेरील एजन्सीवर याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच अजित पवारांचे सचिवालय आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयसोबत चर्चा केल्यानंतर एजन्सीची निवड केली जाईल, असे वृत्त देण्यात आले आहे. यावरून आता विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन

पीआर एनज्सी तात्काळ रद्द करावी

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपयांची खैरात… यांचे काका आजारपणातून बाहेर आल्यानंतर शेतकरी आणि मराठा आरक्षणाची चिंता नाही, त्यांना बार मालकांची चिंता. जनता, डॉक्टर, नर्सेस पैसे आणि पगाराविना तडफडत आहेत. लोक कोरोनामुळे मरत असतानादेखील या निर्लज्ज आणि बेशरम सरकारला आपल्या प्रसिद्धीची चिंता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी सरकारी पैशांवर नेमलेल्या पीआर एनज्सी तात्काळ ररद्द करा आणि याची पूर्ण चौकशी करा, अशी मागणी भातखळकर यांनी यावेळी केली. 

हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल

लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा PR झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? करोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही; नीती आयोगाची कबुली

दरम्यान, राज्यात बुधवारी ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर राज्यात बुधवारी ४६ हजार ७८१ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ५ लाख ४८ हजार १२९ वर पोहोचली आहे. राज्यात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp atul bhatkhalkar criticises thackeray govt on deputy cm ajit pawar social media expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app