शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 15:49 IST

Maharashtra BJP News: राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांसाठीची निवड भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण २२ नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अध्यक्षांची निवड करण्यात आली होती.

राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांसाठीची निवड भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण २२ नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अध्यक्षांची निवड करण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यातील नावांची घोषणा करण्यात आली नव्हती अखेर आज त्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण २२ नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपाकडून आज जाहीर करणयात आलेल्या जिल्ह्याध्यक्षांच्या यादीमध्ये पालघरच्या जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत, वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील, अहिल्यानगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते, नाशिक शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील केदार, नाशिक दक्षिणच्या अध्यक्षपदी सुनील बच्छाव,  नाशिक उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी यतीन कदम, पुणे दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर वडणे, कोल्हापूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

तर गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश बारसागडे, चंद्रपूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासमगुट्टवार, चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा, वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी संजय गाते, परभणी ग्रामीणच्या शहराध्यक्षपदी सुरेश भुबंरे, छत्रपती संभाजीनगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर शितोळे, तालुर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर, लातुर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज पाटील, नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख, नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतुकराव हंबर्डे, बीडच्या जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबईमधील तीन जिल्हाध्यक्षांची निवडही करण्यात आली असून, मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य  मुंबईच्या अध्यक्षपदी निरंजन उभारे आणि दक्षिण मुंबईच्या अध्यक्षपदी शलाका साळवी यांची निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र