शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅसचे अनुदान आठ दिवसांत जमा होणार--लोकमतचा प्रभाव

By admin | Updated: February 13, 2015 00:56 IST

शासनाचा निर्णय : जिल्ह्याला मिळणार सव्वादोन कोटी रुपये; जिल्हा परिषदेकडून अनुदान मिळणार

खोची : सात महिन्यांपासून थकीत असलेल्या बायोगॅसच्या अनुदानापैकी दोन कोटी २२ लाख ६३ हजार ४०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील दोन हजार २८३ लाभार्थ्यांना महिनाअखेरपर्यंत जिल्हा परिषदेकडून हे अनुदान मिळेल. ‘अनुदानाअभावी बायोगॅस लाभार्थीच गॅसवर’, ‘अनुदानाची रक्कम थकीत’ या शिर्षकांखाली दहा दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत शासनाने अखेर अनुदानाची रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला.चालू वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याला नेहमीप्रमाणे सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. १३ हजार ७०० इतके राज्याचे, तर त्यापैकी कोल्हापूरचे ३५३० इतके उद्दिष्ट आहे. यापैकी डिसेंबर २०१४ अखेर जवळपास अडीच हजारांपर्यंत बायोगॅसची उभारणी झाली. अद्याप एक हजाराची उभारणी उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक आहे. तातडीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तालुकानिहाय उद्दिष्ट देऊन ही योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. नऊ हजार रुपये बायोगॅस सयंत्र व शौचालयासाठी १२००, असे १० हजार २०० रुपयांचे अनुदान शासनाकडून मिळते. याचा उभारणी खर्च मात्र ३५ ते ४० हजार इतका आहे. स्वत:चे पैसे घालून लाभार्थ्यांनी बायोगॅस उभे केले. मात्र, अनुदानच मिळाले नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. याबाबतची सविस्तर माहिती ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली. त्यानुसार दखल घेत शासनाने अनुदान वितरणाचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ-दहा दिवसांत लाभार्थ्यांच्या खात्यावर ते जमा होईल. या योजनेसाठी चार कोटी २७ लाख इतके अनुदान मिळणार आहे. पैकी निम्मे देण्याचा निर्णय झाला आहे. (वार्ताहर)