शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा धक्का दिला आहे. शरद पवार गटातील नेते आणि माजी मंत्री व माजी आमदार विनायकराव जाधव पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला. विनायकराव जाधव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा, नांदेड, अकोला, लातूरसह विविध जिल्ह्यांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या वेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही; आपण सगळे सहकारी आहोत,” असे सांगितले. “मला भेटायला कोणालाही अपॉइंटमेंट लागत नाही. मी कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना भेटतो,” असे सांगत त्यांनी सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क अधोरेखित केला, ज्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वास वाढत असल्याचे दिसत आहे. शिंदेसेना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर पुढे चालत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विनायकराव जाधव पाटील यांच्यासह उद्धवसेनेचे संतोष सोमवंशी, नवनाथ भोसले संग्राम पाटील हायगले शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शेतकरी नेते शंकरराव धोंडगे, माजी खासदार सुरेश जाधव हेदेखील उपस्थित होते. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या प्रवेशानंतर लवकरच २५ हजार कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश होणार असल्याचे संकेत देण्यात आले असून दररोज होत असलेल्या प्रवेशांमुळे शिंदेसेनेचा विस्तार आणि संघटनात्मक ताकद वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.
सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत एकनाथ शिंदे यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व विविध योजना, एसटीमध्ये ५०% सवलत, मुलींचे मोफत उच्च शिक्षण आणि पिक विमा योजना यांचा उल्लेख करत “सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे हाच आमचा उद्देश आहे,” असे स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांवर टीका करत ते म्हणाले, “काही जण कोर्टात गेले, पण महिलांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही.”असा पुनरुच्चार त्यांनी केला.
राज्यातील विविध निवडणुकांमध्ये शिंदेसेनेची ताकद वाढत असून पक्ष “नंबर २” वर पोहोचल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले या यशामागे कार्यकर्त्यांची मेहनत असल्याचे त्यांनी सांगितले. “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे लक्ष्य ठेवून संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले असून मतदार यादी, बूथस्तरावरील काम आणि संघटन वाढ यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
Web Summary : In a blow to Sharad Pawar's NCP, former minister Vinayakrao Patil joined Shinde Sena with supporters. Shinde highlighted his accessibility and commitment to grassroots workers, emphasizing the party's growth and focus on public welfare schemes. He aims to strengthen the party at the village level.
Web Summary : शरद पवार की राष्ट्रवादी कांग्रेस को बड़ा झटका लगा है, पूर्व मंत्री विनायकराव पाटिल समर्थकों के साथ शिंदे सेना में शामिल हो गए। शिंदे ने जमीनी स्तर के कार्यकर्ताओं के प्रति अपनी प्रतिबद्धता पर जोर दिया। उन्होंने सार्वजनिक कल्याण योजनाओं पर ध्यान केंद्रित करने की बात कही।