शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांचा बेकायदा निर्णय रद्द

By admin | Updated: February 27, 2015 01:54 IST

छगन भुजबळ यांनी महसूलमंत्री या नात्याने २३ वर्षांपूर्वी दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने तद्दन बेकायदा ठरवून रद्द केला आहे.

मुंबई : पुण्याच्या राष्ट्रीय शिक्षण मंडळासाठी राज्य सरकारने संपादित केलेल्या जमिनीपैकी ४० हजार चौ. फूट जमीन मंडळाने मूळ जमीन मालकांना परत करावी हा छगन भुजबळ यांनी महसूलमंत्री या नात्याने २३ वर्षांपूर्वी दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने तद्दन बेकायदा ठरवून रद्द केला आहे.शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आल्याची बक्षिसी म्हणून महसूलमंत्रीपद मिळाल्यानंतर लगेचच भुजबळ यांनी २७ एप्रिल १९९२ रोजी हा निर्णय दिला होता. त्यानुसार राष्ट्रीय शिक्षण मंडळाने त्यांच्या एकूण संपादित जमिनीपैकी ४० हजार चौ. फूट जमीन मूळ जमीनमालक महादू एस. काळे व त्यांच्या कुटुंबियांना परत करायची होती.भुजबळ यांच्या या आदेशाविरुद्ध मंडळाने केलेली रिट याचिका गेली २३ वर्षे प्रलंबित होती. मध्यंतरी हा विषय उभयपक्षी सहमतीने सोडविणायाचाही प्रयत्न झाला. परंतु त्यात यश न आल्याने अखेर न्या. एम. एस सोनक यांच्यापुढे अंतिम सुनावणी झाली व न्यायालयाने मंत्र्यांचा हा निर्णय बेकायदा ठरवून रद्द केला.3राष्ट्रीय शिक्षण मंडळासाठी सरकारने १९५२ मध्ये एकूण सहा एकर ३१ गुंठे जमीन संपादित केली होती. कालांतराने पुणे महापालिकेने यापैकी ३४,५०६ चौ. फूट जमीन ताब्यात घेऊन त्यावर सार्वजनिक रस्ता बांधला. याचा परिणाम म्हणून मंडळाच्या ताब्यातील जमिनीचे दोन भाग पडले. मुख्य कॅम्पस, क्रीडांगण, डॉर्मिटरी व बॉटॅनिकल गार्डन रस्त्याच्या एका बाजूला व बाकीची १२,८०० चौ. फूट जमीन दुसऱ्या बाजूला अशी विभागणी झाली. दुर्लक्ष होऊ लागल्याने या दुसऱ्या भागावर अतिक्रमण होऊ लागले. ते टाळण्यासाठी मंडळाने तेथे विद्यार्थिनींंसाठी हॉस्टेल बांधायचे ठरविले. पण त्यासाठी निधीची चणचण होती. मंडळाने खासगी विकासकाशी करार करून त्याच्याकडून हे काम करून घेण्याचे ठरविले. यासाठी धर्मादाय आयुक्तांकडून रितसर पूर्वसंमती घेतली गेली. पण सरकारकडून परवानगी घेतली नाही. शिवाय जमीन देताना घातलेल्या अटींनुसार दोन वर्षांत बांधकाम सुरु करून ते पाच वर्षांत पूर्ण केले नाही. यामुळे मंडळाकडून जमीन परत घ्यावी, ही विषयही मंत्री या नात्याने भुजबळ यांच्यापुढे होता. भुजबळ यांनी ३.७५ लाख रुपये दंड आकारून मंडळाने केलेले अटींचे उल्लंघन क्षमाप्रित केले होते. न्यायालयाने भुजबळ यांचा हा निर्णय कायम ठेवला. (विशेष प्रतिनिधी)