शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीची निवडणूक भाजपच्या चांगलीच लक्षात राहणार; उपमहापौर उमेदवारानेही फुटीर महापौरांना मतदान केले; जे बिनविरोध आले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:36 IST

Bhiwandi Mayor Election News Marathi : भिवंडी महापौर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का. नारायण चौधरी, सुहास नकाते यांच्यासह ६ नगरसेवकांची बंडखोरी. प्रभाग १८ मधील सर्व नगरसेवक फुटले. भाजपच्या पराभवाचे सविस्तर विश्लेषण.

भिवंडी : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपने स्वकीयांच्याच बंडखोरीचा कडवट अनुभव घेतला आहे. भाजपचे तब्बल सहा नगरसेवक ऐन निवडणुकीच्या वेळी फुटल्याने भाजपच्या महापौरपदाच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे, या बंडखोर गटाने काँग्रेसप्रणीत 'सेक्युलर फ्रंट'ला उघडपणे साथ दिली.

या बंडखोरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाग १८ मधील भाजपची संपूर्ण फळीच फुटली आहे. प्रभाग १८ अ मधून बिनविरोध निवडून आलेल्या अश्विनी फुटाणकर, १८ ब मधील दिपा मढवी, १८ क मधील शेख अबूशाह आणि १८ द मधील सुहास नकाते या चारही नगरसेवकांनी फुटलेल्या नारायण चौधरांनी मतदान केले. याशिवाय प्रभाग १७ अ मधील नंदीनी गायकवाड आणि स्वतः नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरी यांनी बंडाचा झेंडा फडकवला.

अजब पेच: सुहास नकाते भाजपचे उमेदवार की बंडखोर?
या निवडणुकीत सर्वात मोठा पेच उपमहापौर पदाबाबत पाहायला मिळाला. ज्या सुहास नकाते यांनी भाजपमधून बंडखोरी केली आणि नारायण चौधरी यांना मतदान केले, त्यांनाच भाजपने उपमहापौर पदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केले होते. एका बाजूला पक्षाच्या अधिकृत महापौराला पाडायचे आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचाच उपमहापौर पदाचा उमेदवार म्हणून मिरवायचे, अशा नकाते यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच गोची झाली.

सेक्युलर फ्रंटचा 'मास्टरस्ट्रोक'
भाजपमधील या अंतर्गत कलहाचा फायदा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 'सेक्युलर फ्रंट'ने नारायण चौधरी यांना महापौरपदी बसवून भाजपला खिंडार पाडले. सहा नगरसेवकांच्या या फुटीमुळे भिवंडी भाजपमध्ये आता "कारवाईचा बडगा" उगारला जाण्याची शक्यता आहे, मात्र तोपर्यंत सत्तेची सूत्रे भाजपच्या हातातून निसटली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rebellion Rocks Bhiwandi BJP: Defeat, Defections, and Deputy Mayor Dilemma

Web Summary : Bhiwandi BJP faced a setback as six corporators defected during mayoral elections, backing the Congress-led front. A BJP deputy mayor candidate voted against their own mayoral candidate, causing internal conflict and a power shift to the opposition.
टॅग्स :bhiwandiभिवंडीBhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६