शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब आम्ही कृतघ्न आहोत...

By admin | Updated: December 2, 2014 00:40 IST

देशाचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या महाराजबाग चौकातील भव्य पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या

महापालिकेचे दुर्लक्ष : पुतळ्याची दुरवस्था नागपूर : देशाचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या महाराजबाग चौकातील भव्य पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या सुंदर परिसराची महापालिकेच्या दुर्लक्षामुळे वाताहत झाली आहे. इतकेच नव्हे तर हा परिसर असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर शहराचे महापौर असताना त्यांच्या कार्यकाळात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या भव्य पुतळा महाराजबाग चौकात उभारण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पुतळ्याच्या परिसरात सुंदर उद्यान निर्माण करण्यात आले होते. त्यात विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली होती. लाल रंगाच्या दगडांवर नक्षीदार काम या परिसरात करण्यात आले होते. बसण्यासाठी सुंदर बाके होती. संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था करण्यात आली होती. पाण्याचे कारंजे लावण्यात आले होते. शहरातील अतिशय सुंदर अशा परिसरापैकी हे एक स्थळ होते. कृषी महाविद्यालयाने ही जागा महापालिकेला दिली होती. त्यानंतर त्यांनी पुतळा व इतर कामे केली. परंतु सध्या येथील बाग पूर्णत: नष्ट झाली आहे. फुलझाडांऐवजी सर्वत्र गवत उगवले आहे. कोरीव काम करण्यात आलेल्या दगांमध्ये झाडे उगवली आहेत. बसण्याच्या बाकांच्या जागेवर कचराघर बनले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून याकडे महापालिकेने लक्ष न दिल्याने शहरातील अतिशय सुंदर असलेले हे ठिकाण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. (प्रतिनिधी)