शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधवांना माफ करणार नाही : राणे

By admin | Updated: October 9, 2014 23:03 IST

माजी खासदार नीलेश राणे

चिपळूण : आपण भास्कर जाधव यांना १०० टक्के पाडू. आमच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आमचा उमेदवार निवडून येईल. भविष्यात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक लढविणार नाही, तर आपण रत्नागिरी जिल्ह्यात विशेषकरुन भास्कर जाधव जेथे उभे असतील, त्यांच्यासमोरच आपण निवडणूक लढवू. त्यांना कदापि माफ करणार नाही, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी केले. माजी खासदार राणे आज (गुरुवारी) गुहागर मतदार संघातील कार्यक्रमांसाठी आले असता चिपळूण येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गुहागरमधून निवडणूक लढविण्याबाबत त्यांना विचारले असता उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामुळे आपल्याला निर्णय बदलावा लागला. अन्यथा मी पडलो असतो तरी माजी मंत्री जाधव यांना पाडून पडलो असतो. मतदारसंघात पाच वर्षे विकासकामे न केल्याने त्यांना आता जावेच लागणार आहे. भविष्यात जाधव किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीसमोर आपण लढविणार आहोत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. उद्योगमंत्री नारायण राणे यांची प्रचार सभा गुहागरमध्ये होणार आहे. त्याचे नियोजन आज केले जाईल. वनमंत्री असताना गुहागरमधील शासकीय इमारतींच्या पुनरुज्जीवनासाठी, दुरुस्तीसाठी यांनी काही केले नाही. त्यामुळे नाराजी आहे. आमच्या रक्तात तडजोड नाही. चिपळूण विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारावर नाराजी आहे. सामाजिक स्तरावर त्यांनी मोठे काम केले नाही. उलट आमच्या उमेदवार रश्मी कदम यांचे काम आहे. आघाडी होईल, या अपेक्षेने आपण शेखर निकम यांना पाठिंबा दिला होता. परंतु, आता आमचा उमेदवार रिंगणात असल्याने आम्ही आमच्या उमेदवारासाठी काम करीत आहोत. माजी आमदार सुभाष बने यांच्याबाबतही त्यांनी तोंडसुख घेतले. (प्रतिनिधी)