शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

देश-विदेशातील चित्रकारांच्या भेटीने भारावले चंद्रपुरचे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 5:28 AM

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने ‘जवाहरलाल दर्डा मेमोरियल आर्ट कॅम्प’मध्ये इरई सफारी रिट्रिट ताडोबा (चंद्रपूर) येथे देश-विदेशातील प्रसिद्ध कलाकार आपल्या कुंचल्यातून विविध चित्र साकारत आहेत.

 चंद्रपूर : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने ‘जवाहरलाल दर्डा मेमोरियल आर्ट कॅम्प’मध्ये इरई सफारी रिट्रिट ताडोबा (चंद्रपूर) येथे देश-विदेशातील प्रसिद्ध कलाकार आपल्या कुंचल्यातून विविध चित्र साकारत आहेत. शिबिरादरम्यान चंद्रपुरातील कलाकारांनी त्यांची भेट घेत चित्रकलेविषयी बारकावे जाणून घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे स्थानिक कलाकार भारावले असून या कॅम्पमुळे चित्रकलेतील अनेक गोष्टींची माहिती मिळाल्याचे स्थानिक कलाकारांनी सांगितले. एवढेच नाही, तर सदर कॅम्प चंद्रपुरसारख्या ग्रामीण भागात घेतल्यामुळे त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे.चंद्रपुरातील प्रसिद्ध चित्रकार सुदर्शन बारापात्रे, सदानंद पचारे, सुमित लोहकरे, देवा रामटेके, किरम पराते, स्वामी साळवे, सुहास ताटकंटीवार, मार्कडेवार आदींनी या कलाकारांची त्यांची भेट घेतली. यावेळी चिंत्र रंगविण्याची पद्धत, रंगाविषयी वेगळेपण, मार्केट व्हॅल्यू, चित्रामध्ये काम कसे करायचे, निर्मिती कशी करावी, आकार कसा शोधायचा, चित्राला रंग देताना कसा विचार करायचा, यावर या कलाकारांनी चर्चा करून विविध प्रश्नांचे समाधानकारक उत्तरही दिल्याचे येथील कलाकारांनी सांगितले. या कॅम्पमुळे आम्हाला मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र