शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

भंडारा-गोंदियात भाजपाची मुसंडी, खा.पटोले यांच्या नाराजीचा परिणाम नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 3:16 PM

ग्राम पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व विदर्भात भाजपानं मुसंडी मारलीय. भंडारा–गोंदिया जिल्ह्यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राम पंचायतींवर भाजपाचा भगवा फडकला आहे.

भंडारा-गोंदिया : ग्राम पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व विदर्भात भाजपानं मुसंडी मारलीय. भंडारा–गोंदिया जिल्ह्यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राम पंचायतींवर भाजपाचा भगवा फडकला आहे. खा. नाना पटोले नाराज असल्यामुळे त्यांनी या निवडणुकीत भाजपाचं काम केलं नाही, असं असतानाही गोंदिया भंडारा जिल्ह्यात भाजपाने मोठी मुसंडी मारत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेला चीत केलं आहे. विधानसभा आणि यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीप्रमाणे यावेळेसही गोंदिया भंडारा जिल्ह्यातील मतदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिला. भंडारा गोंदियात 362 पैकी सुरुवातीला सव्वाशेपेक्षा जास्त सरपंच एकट्या भाजपाचे निवडून आले आहेत.भाजपाचे भंडारा गोंदिया येथील खा. नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत, त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत भाजपाच्या पराभावाचेच प्रयत्न केलेत, पण भंडारा गोंदियातील मतदारांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत भाजपाला पहिली पसंती दिली. गोंदिया विधानसभा मतदारसंघात 56 मधून पहिल्या 14 जागांच्या निकालात भाजपाचे 10 सरपंच निवडणून आले आहेत. तर काँग्रेसला फक्त 2 वर समाधान मानावं लागलं. गोरेगावमध्ये 29 पैकी भाजपानं मुसंडी मातर तब्बल 15 ग्राम पंचायतीमंध्ये सरपंच पदाचे उमेदवार निवडूण आणले. साकोली मध्ये 27 पैकी 18 सरपंच भाजपाचे निवडणून आलेय, तर लाखांदूरमध्ये 22 पैकी तब्बल 15 ग्राम पंचायतीत भाजपाला यश मिळालंय, लाखनीमध्ये 18 पैकी सात, देवरीमध्ये 11 ग्राम पंचायतींवर भाजपनं आपला झेंडा फडकवलाय.भंडारा गोंदियात जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश मिळालं, खा. नाना पटोलेंच्या उपद्रव मुल्यांचा भाजपवर कुठलाही परिणाम दिसून आला नसून, मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवत भंडारा – गोंदिया मतदारसंघात भाजपला 65 टक्के ग्राम पंचायतींमध्ये यश मिळालंय.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचBJPभाजपा