Bhagat Singh Koshyari vs NCP: भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र सोडण्याअगोदर... ; राष्ट्रवादीकडून करण्यात आली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 04:31 PM2023-02-13T16:31:22+5:302023-02-13T16:32:24+5:30

कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला

Bhagat Singh Koshyari should apologize before leaving Maharashtra demands NCP Clyde Crasto | Bhagat Singh Koshyari vs NCP: भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र सोडण्याअगोदर... ; राष्ट्रवादीकडून करण्यात आली 'ही' मागणी

Bhagat Singh Koshyari vs NCP: भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र सोडण्याअगोदर... ; राष्ट्रवादीकडून करण्यात आली 'ही' मागणी

googlenewsNext

Bhagat Singh Koshyari vs NCP: महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यपाल म्हणून सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे भगतसिहं कोश्यारी. वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. १५-२० दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून आपणास पदमुक्त करावे अशी विनंती केली होती. त्यानंतर, नुकताच भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. त्याजागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोश्यारी हे पदावरून पायउतार झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले असून त्यांच्याकडून एक मागणी करण्यात आली आहे.

राज्यपालपदी असताना भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील परप्रांतीयांबद्दल केलेले विधान वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वादंग निर्माण झाला होता. तसेच, आणखीही काही वेगळ्या धाटणीचे निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीची नेतेमंडळी काही अंशी नाराज दिसले होते. याच्याच संदर्भात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी कोश्यारींकडे एक मागणी केली आहे. "नेहमीच महाराष्ट्राची बदनामी आणि महापुरुषांचा अपमान केला... कुठलंही चांगलं काम केलं नाही.. मात्र जाता जाता एकतरी चांगलं काम करुन महाराष्ट्राचा त्यांनी निरोप घ्यावा... भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र सोडण्याअगोदर जनतेची माफी मागावी..." अशी मागणी करणारे ट्विट राष्ट्रवादीकचे क्लाईड क्रास्टो यांनी केले आहे.

कोश्यारींनंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?

भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रपतींकडून त्याजागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस हे मूळचे छत्तीसगढच्या राजपूरचे आहेत. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ सालचा असून ते ७५ वर्षांचे आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तर त्याआधी त्रिपुराच्या राज्यपालपदाचाही कारभार सांभाळला आहे. भाजपचे सदस्य असून १९९९ मध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते.

Web Title: Bhagat Singh Koshyari should apologize before leaving Maharashtra demands NCP Clyde Crasto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.