शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

झेंडेंनी बनविले बोगस शिक्के!

By admin | Updated: April 6, 2015 23:20 IST

ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना संभाजी झेंडे यांनी बोगस रबरस्टॅम्प बनवून एका रात्रीत ८ हजार कागदपत्रे बदलून टाकली.

मुंबई : ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना संभाजी झेंडे यांनी बोगस रबरस्टॅम्प बनवून एका रात्रीत ८ हजार कागदपत्रे बदलून टाकली. आता ते एसआरए व म्हाडामध्ये जाऊन बसले आहेत, असा सनसनाटी आरोप करीत आ. नरेंद्र मेहता यांनी आज विधानसभेत मीरा भार्इंदर हद्दीतील ३६८८ सॉल्ट मार्श लॅन्ड जमिनीचा विषय लक्षवेधीद्वारे मांडला.मीरा-भार्इंदर येथील जमिनीचा विषय चांगलाच गाजला. नरेंद्र मेहता यांच्या लक्षवेधीवर अनेक सदस्यांनी मुद्दे उपस्थित केले. या भागात ही कंपनी कोणतेही बांधकाम करताना बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणात कमिशन घेते, कंपनीचे काम संशयास्पद आहे. यात अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत. न्यायालयाच्या निकालाचे चुकीचे अर्थ लावले गेले आहेत. हे काम करणाऱ्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असे सवाल या लक्षवेधीत सदस्यांनी उपस्थित केले.वहिवाटधारकांना विश्वासात न घेता, कोणतीही चौकशी न करता त्यांच्या इस्टेटीवर शिक्के मारले गेले, असा आक्षेप आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी घेतला. तर या भागात दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीची एनओसी मिळत नाही; तोपर्यंत महापालिकेची परवानगी मिळत नाही, असे सांगत या कंपनीचे भागीदार शाहीद बलवा आहेत का, असा प्रश्न आ. प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. लक्षवेधील उत्तर देताना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, या कंपनीकडे ८९९४ एकर जमीन आहे. ती १९४५ साली त्यांनी ब्रिटीश कंपनीकडून विकत घेतली होती. आता त्या कंपनीचे कोण भागीदार आहेत याची माहिती अधिवेशन संपण्याच्या आत सभागृहात ठेवली जाईल. तसेच या सगळ्या प्रकरणाची व तक्रारींची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल. तीन महिन्याच्या आत ती पूर्ण केली जाईल व त्याचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल. (विशेष प्रतिनिधी)