शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील १२ अभियंत्यांचे निलंबन मागे

By admin | Updated: May 14, 2015 02:06 IST

सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या एकामागून एक अधिकाऱ्यांचे निलंबनाचे सत्र सुरू असताना बारा कनिष्ठ अभियंत्यांचे निलंबन चक्क मागे घेण्यात आले आहे.

यदु जोशी, मुंबईसार्वजनिक बांधकाम विभागात सध्या एकामागून एक अधिकाऱ्यांचे निलंबनाचे सत्र सुरू असताना बारा कनिष्ठ अभियंत्यांचे निलंबन चक्क मागे घेण्यात आले आहे. सार्वजिनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी सध्या भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. या बडग्यात मुंबईतील बारा अभियंत्यांना मात्र परतीची संधी मिळाली आहे. हे अभियंते मुंबईतील आहेत. त्यांना तीन महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या अखत्यारित झालेल्या कामांचे मेजरमेंट बूक (एमबी) मोठ्या प्रमाणात वांद्रे येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहातील एका खोलीत आढळल्याने खळबळ उडाली होती. कंत्राटदाराने केलेल्या कामांची नोंद या ‘एमबी’मध्ये केलेली असते. कनिष्ठ अभियंते हे बूक तयार करतात. उपअभियंते त्यांना प्रमाणित करतात आणि नंतर त्या आधारे तयार झालेली बिले कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठविली जातात. जवळपास तीन-एकशे एमबी आढळल्याने अभियंते व कंत्राटदारांमध्ये संगनमत असल्याचे आणि त्यातून खोटी बिले तयार केल्याचे आरोपही झाले होते. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, निलंबन ही शिक्षा नाही. चौकशीच्या आड अधिकारी येऊ नयेत म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. आता विभागीय चौकशी केली जाईल. त्यात हे अभियंते दोषी आढळले तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. या अभियंत्यांना विभागाने मुळीच अभय दिलेले नाही. चौकशी सुरू राहणारच आहे. एमबी प्रकरणात उपअभियंते किंवा कार्यकारी अभियंत्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. बड्या माशांना सोडून छोटे मासे कारवाईच्या जाळ्यात अडकविण्यात आले, अशी चर्चा होती. एमबी घोटाळे केवळ मुंबईतच आहेत, असे नाही. बांधकाम विभागात सगळीकडेच कंत्राटदार एमबी घेऊन बिले मंजुरीसाठी फिरत असतात, हा अनुभव आहे. भ्रष्टाचाराला आमंत्रण देणारी ही साखळी सगळीकडे कायमची बंद करण्यासाठी विभागाकडून अद्यापही प्रभावी पाऊले उचलण्यात आलेली नाहीत.