शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

दास्यमुक्तीसाठी रणरागिणींचा लढा

By admin | Updated: January 3, 2015 01:28 IST

नगर जिल्ह्यात २०१४मध्ये ७५७ महिलांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने स्वत:ची कौटुंबिक छळातून मुक्तता व्हावी, यासाठी यशस्वी लढा दिला़ त्यांच्या संघर्षाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

साहेबराव नरसाळे - अहमदनगरस्त्री दास्यमुक्तीसाठी महिलांना शिक्षित करण्याचा आग्रह धरणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आज महिला मुक्ती दिन म्हणून साजरा होत असताना नगर जिल्ह्यात २०१४मध्ये ७५७ महिलांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने स्वत:ची कौटुंबिक छळातून मुक्तता व्हावी, यासाठी यशस्वी लढा दिला़ त्यांच्या संघर्षाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.महिलांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी व त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी सावित्रीबार्इंनी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली़ मात्र, पुरुषप्रधान व्यवस्थेत आजही ग्रामीण भागात ‘चूल आणि मूल’ एवढ्याच मर्यादित कक्षेत महिलांना वागविले जाते़ त्यामुळे त्यांना हक्कापासून वंचित राहावे लागते़ अनेक महिला वर्षानुवर्षे कौटुंबिक छळ मुकाट्याने सहन करतात़ पीडित महिलांना न्याय देण्यासाठी सरकारने महिला सुरक्षा कायदा लागू केला़ त्याअंतर्गत तक्रार करणाऱ्यांमध्ये शिक्षित महिलांचे प्रमाण अधिक आहे़ या कायद्यांतर्गत २० हजार रुपये दंड आणि एक वर्षाचा कारावास, अशा शिक्षेची तरतूद आहे.या कायद्यामुळे महिलांचा छळ होण्याचे प्रमाण सुमारे २़१३ टक्क्यांनी घटल्याचे महिला सहायता केंद्रातून सांगण्यात आले़सासू-सासऱ्यांची सेवा न केल्यामुळे, इतर कारणातून, चांगला स्वयंपाक न बनविता येणे, विविध कारणांसाठी पैशांची मागणी करणे आदी कारणांतून महिलांचा छळ केला जातो़ त्यास कंटाळून अनेक महिला पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावतात़ एप्रिल २०१४पासून डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत ७५७ महिलांनी वेळेवर जेवायला न देणे, मारहाण करणे, जास्त काम करण्यास सांगणे, हक्क नाकारणे, अपमानास्पद बोलणे आदी कारणांद्वारे छळ होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहायता कक्षाकडे केल्या आहेत़ च्२८२ महिलांचे पती, सासू-सासरे व अन्य नातेवाईक यांचे समुपदेशन करून महिला सहायता कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांनी पीडित महिलांना न्याय मिळवून दिला. तर २०५ महिलांनी कोर्टाच्या माध्यमातून कौटुंबिक छळातून मुक्तता करून घेतली. एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत महिला सहायता कक्षाकडे आलेल्या तक्रारींपैकी ३५ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली नाही़ त्यामुळे पोलीस ठाण्यात ३५ कौटुंबिक छळाचे गुन्हे नोंदविण्यात आले.