शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

काटोलमध्ये काका-पुतण्याची लढाई

By admin | Updated: September 28, 2014 01:06 IST

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष व अमोल यांनी दोन वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी घेत विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. आशिष देशमुख यांनी काटोलमध्ये भाजपच्या

अनिल देशमुखांविरुद्ध आशिष देशमुख उतरले नागपूर : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष व अमोल यांनी दोन वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी घेत विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. आशिष देशमुख यांनी काटोलमध्ये भाजपच्या उमेदवारीवर आपले काका अनिल देशमुख यांच्या विरोधात दंड थोपटले तर डॉ. अमोल देशमुख हे काँग्रेसचा हात सोडत रामटेकमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार झाले आहेत. या राजकीय घटनाक्रमामुळे पुन्हा एकदा देशमुख कुटुंबात दरी वाढली आहे. अनिल देशमुख यांना काटोल विधानसभेचा दांडगा अनुभव आहे. २० वर्षांपासून काटोलच्या राजकारणावर त्यांची पकड आहे. आजवर त्यांना बाहेरच्या विरोधकांना सामोरे जावे लागले. आता मात्र त्यांचे पुतणे आशिष देशमुख हेच भाजपकडून त्यांच्या विरोधात उतरले आहेत. गेल्यावेळी सावनेरमध्ये भाजपकडून लढलेले आशिष देशमुख यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. यावेळी पुन्हा त्यांनी सावनेरवर दावा केला. मात्र, पक्षाने त्यांना नकार देत त्यांना काटोलचा प्रस्ताव दिला. त्यांनी तो स्वीकारलाही. रात्री उशिरा ‘वाड्यावर’ बैठकीनंतर आशिष देशमुख यांचे नाव भाजपकडून काटोलसाठी निश्चित झाले. ही माहिती अनिल देशमुख यांना मिळाली.