शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या राजभवनातही तळघर

By admin | Updated: August 24, 2016 05:21 IST

राज्यातील सर्वात मोठे राजभवन अशी नागपूरच्या राजभवनाची ओळख आहे.

वसीम कुरेशी,

नागपूर- राज्यातील सर्वात मोठे राजभवन अशी नागपूरच्या राजभवनाची ओळख आहे. मुंबईतील राजभवनात ब्रिटिशकालीन भुयार सापडल्यानंतर नागपुरातील राजभवनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील राजभवनातदेखील भुयार असून येथील तळघराला ‘सिल्व्हर गोडावून’ या नावाने ओळखले जाते. या तळघरात चांदीची अनेक किंमती भांडी ठेवली आहेत. याशिवाय येथे जैन धर्माच्या तीर्थंकरांच्या अनेक वर्षे जुन्या मूर्तीदेखील ठेवण्यात आल्या आहेत.१८९१ साली बनविण्यात आलेली ही दिमाखदार इमारत ब्रिटिश शासनकाळात सीपी अ‍ॅन्ड बेरार प्रांताच्या ‘हाय कमिश्नर’चे कार्यालय होती. एकूण २१ एकर परिसरातील या जागेत २२ हजार चौरस फुटात इमारतीचे बांधकाम झाले आहे. या इमारतीत ५० कक्ष आहेत. तर इमारतीच्या तळघरात १५ बाय १५ चे ३ कक्ष आहेत. ब्रिटिशांच्या काळापासूनच या तळघरात मौलिक मूर्ती व चांदीची भांडी ठेवली आहेत. इमारतीच्या काही कामासाठी १० वर्षांअगोदर राज्य पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आली होती. यानंतर कुठल्याही बाहेरील ‘एजन्सी’ने इमारतीसंदर्भात कुठलीही माहिती घेतलेली नाही.>‘हेरिटेज’ समितीचा दावा खोटारमेश येवले यांनी दिलेल्या माहितीनुसार या ‘हेरिटेज’ इमारतीचे प्रलेखन करायला कुणीही आलेले नाही. दुसरीकडे मनपाच्या ‘हेरिटेज’ समितीच्या पदाधिकारी उज्ज्वला चक्रदेव यांनी या इमारतीचे प्रलेखन झाले असल्याचा दावा केला आहे. या इमारतीला घेऊन राज्य पुरातत्व विभाग व भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनेदेखील कुठलेही संशोधन केलेले नाही. तज्ज्ञांच्या मते अशा जागांवर अनेक विशेषता दिसून येऊन शकतील. उपग्रहाच्या छायाचित्रातूनदेखील काही गोष्टींची माहिती मिळते. परंतु राज्यपालांचे निवासस्थान असल्यामुळे येथे कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही.>नागपुरातून मुंबईत जातात भांडीनागपूरचा राजवाडा या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजभवनाच्या तळघरात ठेवण्यात आलेली भांडी विशेष प्रसंगी मुंबईच्या राजभवनात नेण्यात येतात. ही सर्व शाही भांडी असून यांचे वजन जास्त आहे. राजभवनाच्या तळघरात चांदीची भांडी व जैन तीर्थंकराच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यांची नियमितपणे स्वच्छता होते. आतापर्यंत येथे कुणीही कागदी कारवाईसाठी आलेले नाही, अशी माहिती राजभवनाचे अतिरिक्त ‘कंट्रोलर’ रमेश येवले यांनी दिली.