शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बारी घाटात बस दरीत कोसळली, सुदैवाने जीविहानी टळली, तीन प्रवाशी किरकोळ जखमी

By admin | Updated: July 21, 2016 15:27 IST

अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली

ऑनलाइन लोकमतघोटी (नाशिक), दि. २१ : अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली.दरम्यान या बसचे पुढील बंपर तुटल्याने हि बस सुमारे दीड हजाराहून अधिक खोल दरीत कोसळल्यापासून वाचली.यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले.

अकोले आगाराची अकोले हुन कसार्या ला जाण्यासाठी एम.एच.१४ ,बी,टी.११५८ हि बस कासर्या कडे सकाळी साडे आठ वाजता आगारातून निघाली होती.बसचालक मिश्चद्र घोडके व वाहक वर्पे हे चाळीस प्रवासी घेऊन सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बारी घाटातून येत असताना रस्त्यावरील एका खड्ड्यात बस आदळली.यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन बसचे ब्रेक निकामी झाले.अशा स्थितीत बस उजव्या बाजूला खोल दरीत गेली.

दरम्यान बस ने रस्ता सोडल्यामुळे बस खाचरात आदळत गेल्याने पुढील काही साहित्य तुटून ते जमिनीत रोवल्यामुळे हि बस खोल दरीच्या अवघ्या काही फुटाच्या अंतरावर थांबविब्यात चालकाला यश आले.यामुळे सुदैवाने बस मधील चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले.यात चालकासह चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून जखमी प्रवाशांना उपचारार्थ अकोले येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह उपनिरीक्षक कमलेश बच्छाव हवालदार नितीन भालेराव ,चारोस्कर आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ रु ग्णालयात हलविले.

मोठा अनर्थ टळलादरम्यान या बसमधील चाळीस प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून हि बस सुमारे पंधराशे फूट खोलीच्या दरीच्या अवघ्या दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर थांबली.हि बस पुढे गेली असती तर माळशेज घाटात मागील वर्षी जाणार्या अपघाताची पुर्नरावृत्ती झाली असती.व अनेकांचा बळी गेला असता.केवळ चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे.संरक्षण भीती नसल्याने बारी घाट बनला अपघाताचे केंद्रनगर आण नाशिक जिल्ह्याला जोडणार्या या बारी घाटात गेली काही वर्षापासून अनेक अपघात झाले आहेत.या घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकही दिशादर्शक फलक नसल्याने,तसेच संरक्षण भिंती अथवा जाळ्या नसल्याने अपघात वाढत आहेत.या घाटात जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.