शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अमिर खानला पडली ''बारामती'' ची भुरळ ; '' या '' साठी करायचाय तीन ते चार दिवस मुक्काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 17:08 IST

गेल्या दोन तीन वर्षांपासुन याठिकाणी यावे, असे माझ्या मनात होते...

ठळक मुद्देबारामतीत कृषक २०२० प्रदर्शनाच्या उदघाटनाच्यावेळी अभिनेते खान उपस्थितपाणी फाऊंडेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग,पर्यावरण या विषयांवर संवाद

बारामती : अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातुन पवार कुटुंबियांनी केलेले काम खुप मोठे आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासुन याठिकाणी यावे, असे माझ्या मनात होते. येथे येवुन काहीतरी शिकण्याची माझी मनस्वी इच्छा होती. बारामती परिसरात करण्यात आलेले काम हा खुप मोठा विषय आहे. त्यासाठी मला येथे तीन चार दिवस मुक्काम हा विषय पूर्णपणे समजुन घ्यावा लागेल,अशा शब्दांत सिनेअभिनते अमीर खान यांनी देखील त्यांना बारामतीची भुरळ पडल्याची कबुली दिली.बारामतीत कृषक २०२० प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेते खान उपस्थित होते. यावेळी खान यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातुन उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी खान म्हणाले,  पाणी हा मानवी जीवनातील महत्वाचा विषय आहे. शिक्षण हे खुप गरजेचे आहे. पाणी फाऊंडेशनच्या वतीने  आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्ग,पर्यावरण या विषयावर संवाद साधत आहोत. मी आज येथेबोलण्यासाठी नाहीतर शिकण्यासाठी आलो आहे. मात्र, एका दिवसात काहीच कळणार नाही.त्यासाठी तीन चार दिवस मुक्कामी यावे लागेल. शिक्षण आयुष्यावर महत्वाचा परीणाम करते,असे खान म्हणाले.यावेळी खान म्हणाले, पाण्यापासुन सुरवात करण्याचा आम्ही निर्णय घेतला.महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याने याच ठिकाणापासुन आम्ही सुरूवात केली.पाणी फाउंडेशनच्या माध्यमातुन गेल्या चार वर्षांपासून आम्ही वॉटर मॅनेजमेंट शिकवत आहोत. गावातील लोकच हे काम करीत आहेत,आम्ही त्यांना केवळ शिकवत आहोत.पाण्याच्या नियोजनाबरोबर आम्ही जमिनीचे आरोग्य, गवत लागवडक्षेत्र निर्माण करणे,रीफॉरेस्ट्रेशन, पिक नियोजन,पाणी व्यवस्थापन या पाचविषयांवर पाणी फाउंडेशन काम करणार आहे.या विषयांच्या मुळाशी जाणार असल्याचे अभिनेते खान म्हणाले. यावेळी खान यांनी ग्रामीणशी संबंधित प्रश्नांवर सर्वच क्षेत्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अधिक अभ्यास आहे. त्यांच्याकडेच ग्रामीण समस्यांचे समाधान असल्याचे खान म्हणाले.——————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीAamir Khanआमिर खानSharad Pawarशरद पवारagricultureशेती