शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर वासवानी नासुप्रमध्ये परतणार

By admin | Updated: May 30, 2014 01:10 IST

लाच घेतांना रंगहात पकडल्या गेलेला नागपूर सुधार प्रन्यासचा (नासुप्र) निलंबित अधीक्षक अभियंता नानक वासवानी पुन्हा नासुप्रमध्ये परतणार आहे. विश्‍वस्त मंडळाने तसा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

विश्‍वस्त मंडळाचे धक्कादायक शिक्कामोर्तब :   दोन महिन्यांनी होणार सेवानवृत्तनागपूर : लाच घेतांना रंगहात पकडल्या गेलेला नागपूर सुधार प्रन्यासचा (नासुप्र) निलंबित  अधीक्षक अभियंता नानक वासवानी पुन्हा नासुप्रमध्ये परतणार आहे. विश्‍वस्त मंडळाने तसा  धक्कादायक निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत विश्‍वस्तांनी वासवानीला कुठलेही पद  न देता नासुप्रमध्ये रुजू करुन घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. लाचखोर अधिकार्‍यासाठी  नासुप्रचे विश्‍वस्त सरसावल्याने नासुप्रच्या वतरुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.विशेष म्हणजे येत्या दोन महिन्यात वासवानी सेवानवृत्त होणार आहे. त्याला वेतन व सर्व प्रकारचा  लाभ मिळवून देण्यासाठी विश्‍वस्तांनी हे पाऊल उचलल्याचे बालले जात आहे. २00७ मध्ये  वासवानीला लाच घेण्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. निलंबनाच्या कालावधीत  त्यांना ७५ टक्के वेतन मिळत होते. आता नासुप्रच्या सर्व विश्‍वस्तांनी एकत्र येवून वासवानीला परत  आणण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या जीआरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, आर्थिक  अनियमिततेच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या कर्मचारी व अधिकार्‍याला ७५ टक्के  वेतन देण्यात येत असेल तर त्याच्याकडून कार्यालयीन कामेही काढून घ्यावी. गेल्या ७ वर्षापासून  वासवानी निलंबित आहे. १९८४ मध्ये वासवानी नासुप्रमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाले होते. २00१ मध्ये  वासवानीला कार्यकारी अभियंता पदावरून अधीक्षक अभियंता पदावर अस्थायी पदोन्नती देण्यात  आली होती. तेव्हा वासवानीची नासुप्रमध्ये चांगलीच चलती होती. त्याच्या मंजूरीशिवाय कुठलेही  काम होत नव्हते. वासवानी लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर तपासात अनेक खुलासे  झाले. अनेक प्रकरणाला दाबण्याचाही प्रयत्न झाला. लाचलूचपत विभागाने १८ जानेवारी २00७  रोजी लाच घेताना वासवानीला रंगेहाथ अटक केले होते. त्याचदिवशी नासुप्रने त्यांना निलंबित केले  होते. २00९ मध्ये वासवानीच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याला मंजूरी दिली  होती.  पोलीसांनी वासवानीच्या घराची चौकशी केली असता, एलआयसी ऐजंट असलेला त्याचा  मुलगा हितेश याने ११0 पॉसिलीच्या माध्यमातून ११.0१ कोटीचा व्यवसाय केला आहे. त्याला  कमिशनच्या स्वरुपात २0 लाख ७९ हजार ४३८ रुपये मिळाले होते. पोलीसांनी वासवानीच्या  मुलाच्या विरोधातही गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)