शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमध्ये बाबासाहेबांचे स्मारक

By admin | Updated: February 4, 2015 02:14 IST

आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या घराची किंमत ४१ कोटी रुपये आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन होणारमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ वास्तव्य केलेले लंडन येथील घर राज्य शासनातर्फे खरेदी करून ते आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या घराची किंमत ४१ कोटी रुपये आहे. घर खरेदीची प्रक्रि या पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. खरेदीची ही प्रक्रि या तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.डॉ. आंबेडकर यांनी १९२१-२२ या कालावधीत लंडन येथील १० किंग्ज हेन्री रोड, एनडब्ल्यू ३ या घरात वास्तव्य केले होते. या कालावधीत त्यांनी लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून डीएस्ससी इन इकॉनॉमिक्स आणि ग्रेझ इन या संस्थेतून बार अ‍ॅट लॉ या पदव्या संपादित केल्या. या वास्तव्यादरम्यान त्यांनी विविध विषयांवर संशोधनात्मक लिखाण केले होते. (विशेष प्रतिनिधी)समितीत तावडे नाहीतच्लंडनमधील घर खरेदी करण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेतला होता. एका परिषदेसाठी ते लंडनला गेले असता त्यांनी या घराला भेट दिली आणि संबंधितांशी चर्चादेखील केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर, हे घर शासन खरेदी करणार असल्याचे तावडेंनी जाहीर केले होते. मात्र, घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीत तावडे यांचा समावेश नाही.