शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

Babanrao Taywade: ओबीसींच्या जागा कमी झाल्या, महासंघ जाणार हायकोर्टात: बबनराव तायवाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:06 IST

डॉ. तायवाडे यांनी शनिवारी रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदनही दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगाने एससी, एसटी, महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या नजीकच्या पूर्ण संख्येत मोजण्याची सूट दिली. पण, हीच पद्धत ओबीसीसाठी विचारात घेणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ओबीसींवर हा अन्याय आहे. या  विरोधात सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले. राज्यातील मुंबईसह नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत रद्द करावी. नव्याने आदेश काढावा व  नव्याने पूर्णांक संख्या गृहीत धरून आरक्षण काढावे. डॉ. तायवाडे यांनी शनिवारी रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदनही दिले. 

नागपूरमध्ये ओबीसींना मिळाली एक जागा कमी

नागपूर महापालिकेत १५१ जागा आहेत. २७ टक्के ओबीसी आरक्षण धरले तर ४०.७७ जागा येतात. त्यामुळे ओबीसीसाठी  ४१ जागा यायला हव्यात. पण प्रत्यक्षात ४० जागा दिल्या आहेत. एससी, एसटी व महिलांच्या बाबतीत ०.५० टक्क्यांपुढे असेल तर पुढचा पूर्णांक आकडा पकडला जातो. पण ओबीसींच्या बाबतीत तसे केले नाही. बहुतांश ठिकाणी आरक्षण सोडतीत ओबीसींची एक जागा कमी झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : OBC Seat Reduction: Federation to Challenge in High Court

Web Summary : Babanrao Taywade asserts OBC seat reduction in local bodies is unjust. The National OBC Federation will challenge the state election commission's decision in High Court. He demands fresh reservation orders considering full numbers, following SC, ST norms.
टॅग्स :nagpurनागपूरreservationआरक्षणMaharashtraमहाराष्ट्र