Aurangabad district president Gautam Amrao has been removed from the MNS | मनसेने केली जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; राज ठाकरेंनी दिला होता इशारा

मनसेने केली जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; राज ठाकरेंनी दिला होता इशारा

मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच औरंगाबाद दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये राज ठाकरेंनीमनसे पक्षातील काही पदाधिकारीच वाईट बातम्या पेरण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. तसेच वाईट आणि खोट्या बातम्या पेरणाऱ्या गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर आता मनसेने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबादमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसे पक्षातील अंतर्गत बातम्या पसरवण्याचा संशल गौतम अमराव यांच्यावर होता. तसेच पक्षादेश न पाळल्याने गौतम यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे तीन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. यावेळी राज ठाकरेंनी मनसे पक्षाबाबत काही पदाधिकारी जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवत आहे. तसेच अशा पदाधिकारांची नावं देखील माझ्याकडे आली असून अशा गद्दारांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला होता. 

Web Title: Aurangabad district president Gautam Amrao has been removed from the MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.