शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सणांना हजेरी सक्तीची

By admin | Updated: August 19, 2014 23:43 IST

लक्षणीय अनुपस्थिती : राष्ट्रीय सणाचे गांभीर्य नाही

सागर पाटील - टेंभ्ये  -राज्यात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन हे तीन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. संपूर्ण राज्यभर हे सण अत्यंत उत्साहात साजरे होतात. परंतु शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील या दिवसांची उपस्थिती मात्र चिंतनीय होत आहे. या राष्ट्रीय सणाच्या दिवशी कार्यालयात असणाऱ्या अनुपस्थितीचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी हजेरी पत्रकावर सही सक्तीची मानली जात नाही. त्यामुळे अनेकजणांना हा दिवस म्हणजे सुटीचा दिवस वाटतो. नुकताच ६८वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. परंतु या दिनाला अपवादात्मक स्थितीमध्येच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. बहुतांश शासकीय कार्यालयांत अधिकारी व मोजकेच कर्मचारी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत होते. हा दिवस ‘नॉन इन्स्ट्रक्शनल डे’ मानला जातो. त्यामुळे कार्यालयातील हजेरी पत्रकावर सही घेतली जात नाही. यावेळचा स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आल्याने अनेकजणांनी शनिवारची रजा टाकून जोडून येणाऱ्या सोमवारच्या पतेतीच्या सुटीचा लाभ घेतला. एक रजा टाकून सलग चार दिवस सुटी मिळत असल्याने अनेकांनी वर्षा सहलीचे आयोजन करून पर्यटनाचा आनंद लुटला. त्यामुळे या कालावधीत पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या गर्दीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत होते. राष्ट्रीय सणांमधून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या मुल्यांची रुजवणूक केली जाते. अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. याची जाणीव सर्वांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी स्वातंत्र्य दिनाला उपस्थिती आवश्यक आहे. या दिवसांचे रुपांतर सुटीच्या दिवसामध्ये झाल्यास त्यांचे महत्त्व नामशेष होईल. यामुळे भावी पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या महत्त्वाच्या मुल्यांची रुजवणूक करणे अशक्य होईल. राष्ट्रीय सणांचे महत्व टिकून राहावे, यासाठी या दिवसाला कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करणे आवश्यक आहे. काही कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाला अन्य ठिकाणी उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे केले जाते. यामुळे संबंधित कर्मचारी ध्वजारोहणाला उपस्थित होता, हे निश्चित होते. एकंदरीत राष्ट्रीय सणांना कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करण्यासाठी या हजेरीपत्रकांवर सही घेणे आवश्यक असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.  

विशेष प्रयत्न सुरू झालेत  -शिक्षक १०० टक्के उपस्थित! राष्ट्रीय सणांना उपस्थित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण पाहिल्यास यामध्ये सर्व स्तरावरील शिक्षक १०० टक्के उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळते. शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचारीदेखील १०० टक्के उपस्थित असतात. शाळांमधून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या महत्त्वाच्या मुल्यांचे जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी अनुपस्थित राहून वर्षा सहलीचा आनंद लुटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी.  सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करणे अनिवार्य.