अत्रे यांची सांगीतिक जीवनगाथा उलगडणार

By Admin | Updated: July 10, 2014 23:32 IST2014-07-10T23:32:30+5:302014-07-10T23:32:30+5:30

एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्ऱे त्यांची संपूर्ण जीवनगाथा सांगीतिक स्वरूपात ‘अत्रे-अत्रे सर्वत्रे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आह़े

Atre's musical career will be revealed | अत्रे यांची सांगीतिक जीवनगाथा उलगडणार

अत्रे यांची सांगीतिक जीवनगाथा उलगडणार

पुणो : शिक्षण, साहित्य, नाटक, पत्रकारिता, राजकारण अशा विविध क्षेत्रंमध्ये शिखरावर विराजमान झालेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्ऱे त्यांची संपूर्ण जीवनगाथा सांगीतिक स्वरूपात ‘अत्रे-अत्रे सर्वत्रे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आह़े 
या कार्यक्रमाची संकल्पना अशोक हांडे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत स्पष्ट केली़ 
हांडे म्हणाले, ‘‘आजच्या चित्रपटांतील एकही गाणो लक्षात राहील असे नाही़ जुनी गाणी मात्र रसिकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहेत़ ‘यमुनाजळी खेळ खेळू’, ‘भरजरी गं पीतांबर’, यांसारखी अनेक गीते अत्रे यांच्या लेखणीतून अजरामर झाली़ चित्रपटातील पहिले द्वंदगीतही अत्रे यांनीच लिहिल़े याची माहिती खूप कमी रसिकांना आह़े पुढच्या पिढीर्पयत अत्रे यांच्या संगीताचा वारसा पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे प्रयत्न केले जात आहेत़ अत्रे यांच्या कन्या शिरीष पै, मीना देशपांडे, नातू राजेंद्र पै यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमाची संहिता तयार करण्यात आली आह़े’’
राजेंद्र पै म्हणाले, ‘‘पुण्यात हा कार्यक्रम होत असल्याचे आम्हाला विशेष अप्रूप आह़े अत्रे यांचे पुण्यावर नितांत प्रेम होत़े 1961मध्ये ज्या वेळी पानशेत धरण फुटले, त्या वेळी संपूर्ण पुणो शहर पाण्यात वाहून गेले होत़े ही बातमी कळताच अत्रे तातडीने पुण्यात आले होत़े त्यानंतर धरणांचा अभ्यास करून तपशीलवार लेख त्यांनी ‘मराठा’मध्ये लिहिला होता,’’ अशी आठवणही त्यांनी या वेळी सांगितली़
शुक्रवारी, 11 जुलै रोजी अशोक हांडे बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 वाजता हा दृकश्रव्य कार्यक्रम सादर करणार आहेत़ 
 
4पुढच्या पिढीर्पयत अत्रे 
यांच्या संगीताचा वारसा पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे प्रयत्न. 
4शिरीष पै, मीना देशपांडे, 
राजेंद्र पै यांच्याशी चर्चा करून कार्यक्रम.

 

Web Title: Atre's musical career will be revealed