शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्त अडकले

By admin | Updated: December 16, 2014 01:11 IST

अन्न व औषध प्रशासनाचा सहायक आयुक्त तसेच लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने लाच घेताना जेरबंद केले. ज्ञानदेव लक्ष्मण कुरकुटे (वय ५५, स. आयुक्त) आणि

लिपिकही पकडला : अन्न व औषध प्रशासनाला हादरा नागपूर : अन्न व औषध प्रशासनाचा सहायक आयुक्त तसेच लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने लाच घेताना जेरबंद केले. ज्ञानदेव लक्ष्मण कुरकुटे (वय ५५, स. आयुक्त) आणि अजय लक्ष्मण खडसे (वय ३६, लिपिक) अशी आरोपींची नावे आहेत. मेडिकल स्टोर्सच्या परवान्यासाठी सहायक आयुक्ताने पाच हजाराची तर लिपिकाने एक हजाराची लाच मागितली होती. फहिमुद्दीन काझी हे टेका नाका परिसरात राहतात. त्यांना मेडिकल स्टोर्स सुरू करायचे आहे. परवाना मिळावा म्हणून त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज केला होता. आज काझी कुरकुटेकडे गेले. त्यांनी काझीला ‘पाकिट लाये क्या’, असे विचारले. काझीने ‘कशाचे पाकिट’, असे विचारले असता कुरकुटेने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली. तीन हजारात सौदा पक्का केला. त्यानंतर टंकलेखक खडसेने एक हजाराची लाच मागितली. (प्रतिनिधी)झटपट सापळा, फटाफट कारवाई छोट्याशा कामासाठी अधिकारी अन् कर्मचारी लाच मागत असल्यामुळे आज दुपारी १ वाजता काझी यांनी एसीबीच्या कार्यालयात तक्रार नोंदवली. अधीक्षक प्रकाश जाधव यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सायंकाळी ५ च्या सुमारास या दोघांना त्यांच्याच कार्यालयात लाच स्वीकारताना जेरबंद करण्यात आले. साताऱ्यातील निवासस्थानीही झडती आरोपी कुरकुटे हा वर्ग १(क्लास वन)चा अधिकारी असून, तो गुरुवारपेठ सातारा येथील रहिवासी आहे. खडसे मूळचा अमरावतीचा रहिवासी आहे. लाच घेताना पकडल्यानंतर कुरकुटेच्या नागपूर आणि साताऱ्यातील निवासस्थानी एसीबीच्या पथकाने झडती सुरू केली. त्यात नेमके काय मिळाले, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही.