‘ताकद राहिली नाही’, दैवी शक्तीचा दावा करणारा अशोक खरात झाला गलितगात्र, फोटो पाहून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 22:39 IST2026-03-22T22:38:16+5:302026-03-22T22:39:05+5:30
Ashok Kharat Case: दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा अशोक खरात हा गेल्या तीन चार दिवसांपासून पोलिसांकडून सुरू असलेल्या पाहुणचारामुळे चांगलाच कोलमडला असून, गतिलगात्र झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे समोर आले आहे आहे.

‘ताकद राहिली नाही’, दैवी शक्तीचा दावा करणारा अशोक खरात झाला गलितगात्र, फोटो पाहून बसेल धक्का
अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटकेची कारवाई केलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. तसेच पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, स्वत:ला अवतार म्हणवणारा, आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा अशोक खरात हा गेल्या तीन चार दिवसांपासून पोलिसांकडून सुरू असलेल्या पाहुणचारामुळे चांगलाच कोलमडला असून, गतिलगात्र झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे समोर आले आहे आहे.
भोंदू ज्योतिषी अशोक खरात याला पोलीस त्यांच्यासोबत नेत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये काही दिवसांपूर्वी बड्या नेत्यांसमोर मोठ्या तोऱ्यात वावरणारा आणि महिलांचं शोषण करणारा अशोक खरात हा कमालीचा गलितगात्र आणि अशक्त झालेला दिसत आहे. तसेच तिथे उपस्थित असलेले त्याच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या घोषणा म्हणवून घेताना दिसत आहेत. यावेळी आता ताकद नाही राहिली, असे खरात म्हणत असल्याचे या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.
दरम्यान, अनेक महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरातची नाशिकमधील पोलीस हेडक्वाटर्समधील हिमांशू पोलीस क्लब येथे गेल्या तीन दिवसांपासून चौकशी केली जात होती. दरम्यान, आता पोलिसांनी अशोक खरात याच्या चौकशीचं ठिकाण बदललं असून, त्याला अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकशी केली जात आहे.
अशोक खरात याच्या कारकिर्दीची सुरुवात ही मर्चेंट नेव्हीमधून झाली होती. जगभर फिरल्यामुळे त्याने इंग्रजीसह अनेक परदेशी भाषा आत्मसात केल्या. भारतात परतल्यानंतर त्याने दक्षिण भारतीय भाषांवरही प्रभुत्व मिळवले. याच काळात त्याने अंकशास्त्र या विषयाचा अभ्यास करून लोकांचे भविष्य सांगण्यास सुरुवात केली. हळूहळू या अंकशास्त्राला त्याने भोंदूपणाची जोड दिली. माझ्या शरीरात प्रत्यक्ष महादेव येतात, असे सांगून त्याने लोकांच्या मनात भीती आणि श्रद्धा यांचे अजब मिश्रण तयार केले. ब्लॅक मॅजिकच्या अफवा पसरवून त्याने अनेकांना मानसिक गुलाम बनवले होते.