शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

जल्लोषात ‘श्रीं’चे आगमन

By admin | Updated: September 6, 2016 01:21 IST

ढोल-ताशांच्या दणदणाटात, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया....’ अशा जयघोषात उद्योगनगरीत लाडक्या गणरायाचे आगमन झाले.

पिंपरी : ढोल-ताशांच्या दणदणाटात, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया....’ अशा जयघोषात उद्योगनगरीत लाडक्या गणरायाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनाने उद्योगनगरी गणेशमय झाली आहे. गणेशोत्सवाची सुरुवात आज झाली. गणरायाला घरी आणण्यासाठी आबालवृद्ध गणेशभक्तांची दिवसभर लगबग सुरू होती. दिवसभर भक्तांमध्ये अपूर्व चैतन्य जाणवत होते. सकाळच्या वेळी भक्तांनी घरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली़ त्याचबरोबर उद्योगनगरीतील अनेक कंपन्यांमध्ये कंपन्यातील उत्सवाची सुरुवात झाली. बाजारात विविध स्टॉलवर गणपती बाप्पांना घरी नेण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती़ पिंपरी आणि चिंचवडमधील प्रमुख बाजारपेठेतही पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी झाली होती. धूप, अगरबत्ती, तेलाच्या वाती, सुपारी, श्रीफ ळ आदी पूजा साहित्य आणि मिठाईच्या दुकानात पेढे, मोदक खरेदी करण्याची लगबग सुरू होती. दुपारनंतर अनेक मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात गणपतीची मिरवणुकीद्वारे बाप्पाला घरी आणले. शहरातील ८१८ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. पिंपरी-चिंचवड, दापोडी, बोपोडी, खडकी, निगडी, नेहरुनगर, सांगवी, वाकड, भोसरी, थेरगाव, आकुर्डी या परिसरातील विविध मंडळांनी गणपती बाप्पांचे उत्साहात स्वागत केले़ (प्रतिनिधी)>गर्दीमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात वाहतूक कोंडीपिंपरी : गणेशमूर्ती खरेदीसाठी सकाळपासूनच स्टॉलवर गर्दी असल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले होते. त्यात बेशिस्त वाहनचालकांनी रस्त्यातच मोटारी उभ्या केल्यामुळे या कोंडीत अधिकच भर पडली. पिंपरीतील शगून चौकात तर पिंपरीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. चिंचवडगाव, निगडी, भोसरी, काळेवाडी, थेरगाव, वाकड अशा विविध ठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल उभारण्यात आले होते. स्टॉलवर आज दिवसभर गर्दी होती. वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागातर्फे वाहतूक पोलीस तैनात होते. काळेवाडीहून पिंपरीकडे येणारा रस्ता, शगून चौक परिसरातही कोंडी झाली होती. सायंकाळच्या दरम्यान काळेवाडीहून पिंपरीकडे येणारी वाहतूक इंदिरा गांधी उड्डाणपुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. पिंपरीतून पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि भोसरीतील पीएमटी चौकातही कोंडी झाली होती.