शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवलीत पोलिसांवर हल्ला करणाऱ्यास अटक

By admin | Updated: September 23, 2014 05:20 IST

त्तर प्रदेश पोलिसांवर हल्ला करून पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने कांदिवली येथून अटक केली

मुंबई : उत्तर प्रदेश पोलिसांवर हल्ला करून पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने कांदिवली येथून अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.अरुण राय ऊर्फ ठाकूर (३४) असे या आरोपीचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील आझमगड येथील राहणारा आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने एका नेत्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र याच दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवल्याने त्यांनी पोलिसांवरच गोळीबार करून पळ काढला. यामध्ये दोन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. मात्र या आरोपीने तिथून पळ काढत मुंबई गाठली. गेल्या दोन महिन्यांपासून तो अरुण ठाकूर या नावानेच मुंबईत राहत होता. या आरोपीबाबत गुन्हे शाखेला माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी कांदिवलीतील लालजी पाडा परिसरात सापळा रचला. दरम्यान सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला कांदिवली परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याजवळ ७.६५ बोअरची एक रिव्हॉल्व्हर आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. त्यानुसार कांदिवली पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. (प्रतिनिधी)