शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करा - विखे-पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 6:00 PM

महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मुंबई -  महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

सोमवारी दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आज पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण मागील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे 500 तरूणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असेल तर पोलिसांनी डॉ. जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. कट्टरवादी संघटनांना वेसण घालण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर अटकेची ही कारवाई तातडीने केली जाईल, असे ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी हमीद दाभोलकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मूळ सूत्रधाराचा पर्दाफाश करण्याची मागणी केली होती. आज पुण्यात निघालेल्या मोर्चातून देखील हीच मागणी करण्यात आली आहे. या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

डॉ. जयंत आठवले गप्प का आहेत?डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, प्रोफेसर एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडाच आजवर फक्त प्यादे जेरबंद झाले आहेत. पण देशात सुरू असलेले षडयंत्र नेस्तनाबूत करायचे असेल तर त्यासाठी याचे कर्ते-करविते ‘महागुरू’समाजासमोर आणून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे. या चारही हत्याकांडात सातत्याने सनातनचे नाव घेतले जाते. पण या संघटनेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले गप्प का आहेत? त्यांच्याऐवजी त्यांचे दुसऱ्या अन् तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते समोर येऊन खुलासे का करीत आहेत? असे प्रश्नही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केले. 

महाराष्ट्र एटीएसने मागील दोन आठवड्यांमध्ये केलेल्या कारवाईचे खरे श्रेय कर्नाटक एटीएसला आहे. गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास करताना त्यांनी अनेक गोष्टींचा छडा लावला आणि त्यातूनच महाराष्ट्रातील हे कट्टरवादी ‘नेटवर्क’ समोर आले. अन्यथा वैभव राऊतचे बॉम्ब फुटेपर्यंत राज्य सरकारला महाराष्ट्रात काय सुरू आहे,याचा पत्ता लागला नसता, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

देशाविरूद्ध छुपे युद्धमहाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शस्त्रे व बॉम्बसाठा सापडतो, तरूणांना फितवून शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण दिल्याचे दिसून येते, संशयीत मारेकऱ्यांकडे डायरीत पुरोगामी चळवळीतील विचारवंतांची'हिटलिस्ट' सापडते. देशविघातक कारवायांचे एवढे पुरावे हाती लागल्यानंतरही सरकार गप्पच आहे. प्रारंभी विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. आता सामूहिक हत्यांचा कट रचला जातो आहे. वैभव राऊतकडे सापडलेले 20 बॉम्ब, 21 गावठी पिस्तुले दिवाळी साजरी करायला आणलेले नव्हते. बकरी ईद,गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांमध्ये बॉम्ब फोडून त्यांना धार्मिक हिंसाचार घडवायचा होता. मराठा क्रांती मोर्चामध्ये बॉम्ब फोडून राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात आणायचा होता.  या साऱ्या बाबी देशाविरूद्ध छुपे युद्ध पुकारल्यासारखे असून, यापश्चातही सरकार संबंधित संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय का घेत नाही? अशी संतप्त विचारणा विखे पाटील यांनी केली.

कार्यपद्धती ‘अल कायदा’सारखीच!या संघटनांचे काम ‘अल कायदा’सारख्या दहशतवादी संघटनांच्या तोडीस तोड अशा गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. प्रत्यक्ष हल्ला करणारे निराळे, त्यांना शस्त्रे देणारे निराळे,हत्येची योजना आखणारे निराळे, आणि कोणाची हत्या करायची, हे ठरविणारेही निराळेच आहेत. प्रत्येकाला त्याची जबाबदारी ठरवून दिलेली असते व त्यापलिकडे त्याला इतर काहीच माहिती नसते. त्यामुळेच डॉ. दाभोलकर व कॉम्रेड पानसरेंच्या हत्या प्रकरणात अनेकांना अटक झाल्यानंतरही आजवर संपूर्ण कट उघडकीस येऊ शकलेला नाही.

‘ब्रेन वॉश’ करणारे ‘महागुरू’ कोण?महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्याकांडातील आरोपी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. बहुजन समाजाची तरूण मुले आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील नाही. कपड्याच्या दुकानात काम करणारा सचिन अंदुरे आणि ‘लेथ मशीन’वर काम करणाऱ्या शरद कळसकरचा डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. तरीही त्यांच्याकडे पिस्तूल येते आणि ते थंड डोक्याने डॉ. दाभोलकरांची हत्या करतात; यासाठी केवळ ‘ब्रेन वॉश’कारणीभूत असून, हा ‘ब्रेन वॉश’ करणारे‘महागुरू’ कोण? ते शोधण्याची गरज असल्याचे विखे पाटील म्हणाले.

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भेट घेणारगौरी लंकेश हत्येमध्ये सनातनसारख्या संघटनेची नेमकी कशी भूमिका होती, हे जाणून घेण्यासाठी आपण लवकरच कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, कर्नाटक एटीएसकडे पुरेसे पुरावे असतील तर त्यांनी गौरी लंकेश हत्येसाठी थेट सनातनविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. त्याआधारे सनातनवर बंदी घालण्यासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्याचा मानस असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण