शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या हाती फुटाणे!

By admin | Updated: December 3, 2014 10:37 IST

उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यासारखी महत्वाची पदे आणि गृह, अर्थ, गृहनिर्माण यासारखी महत्वाची खाती

मुंबई : उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यासारखी महत्वाची पदे आणि गृह, अर्थ, गृहनिर्माण यासारखी महत्वाची खाती मागून स्वाभिमानाच्या बेटकुळ्या दाखविणा-या शिवसेनेच्या हातावर भाजपाने आरोग्य, पर्यावरण, उद्योग यासारख्या कमी महत्वाच्या खात्यांचे चणे-फुटाणेच ठेवले. पाच कॅबिनेट आणि सात राज्यमंत्री पदं पदारात पाडून घेऊन शिवसेनेने निवडणुकीत जे कमावले, ते तहात गामवले, अशीच सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपासोबत असलेली युती तोडून स्वतंत्रपणे लढलेल्या शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या, तर १२३ जागा मिळवून भाजपाने सरकार स्थापन केले. बहुमतासाठी भाजपाला जागा कमी पडत असल्याने भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेने अटी-शर्र्थींची भलीमोठी यादीच पुढे केली. उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षपद या पदांवर दावा सांगत असतानाच गृह, अर्थ, महसूल, बांधकाम अशा खात्यांसाठी आग्रह धरला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने देऊ केलेल्या बिनशर्त पाठिंब्यावर भाजपाने विश्वसादर्शक ठराव जिंकला. सत्तेसाठी अडून बसलेल्या शिवसेनेने मग विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतले. एकीकडे विरोधी पक्षाची भूमिका वठवतानाच दुसरीकडे सत्ता सहभागाकरिता ‘वर्षाह्णचे दार ठोठावणे सुरु ठेवले. सेनेच्या अनंत गिते यांनी अखेरपर्यंत मंत्रीपद सोडले नाही. त्यामुळे सत्ता सहभागाची आसुसलेल्या सेनेला वाटाघाटीच्या चक्रव्यूहात अडकवून तब्बल दीड महिन्यांनंतर कमी महत्वाच्या खाती हातावर टेकवली. (विशेष प्रतिनिधी)> शिवसेना नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते आदींच्या उपस्थितीत मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेला देऊ केलेल्या खात्यांबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली.मात्र आता मनाजोगी खाती मिळत नाहीत, म्हणून सत्तेत सहभागी न होण्याची भूमिका घेतली तर जनतेमध्ये छी थू होईल, असे सर्वांचे मत पडले. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्र्यांशी बोलून गृहनिर्माण किंवा सार्वजनिक बांधकाम खाते मिळवून अब्रू राखावी, अशी भावना व्यक्त झाल्याचे समजते.