शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वारांगनांना देहविक्री न करण्याचे खासदार शेट्टींचे पोस्टरद्वारे आवाहन

By admin | Updated: January 26, 2015 04:53 IST

कांदिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकांच्या बाहेर गेले २५ वर्ष देहविक्री व्यापार सुरु आहे. त्यामुळे अनेकांना याचा नाहक त्रास होतो

मुंबई: कांदिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकांच्या बाहेर गेले २५ वर्ष देहविक्री व्यापार सुरु आहे. त्यामुळे अनेकांना याचा नाहक त्रास होतो. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी देहविक्री करु नका, या वेश्या व्यवसायातून बाहेर पडा, समाजात सन्मानाने जगण्याची आणि पोट भरण्याची सोय समाजामार्फत मी करीन, असे भावनिक आवाहन केले आहे. कांदिवली स्थानक परिसरात अशा आशयाचे होर्डिंग झळकले आहेत. शेट्टी यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. एकीकडे मुंबई समाज सेवा शाखा देहविक्रीचे अड्डे उध्द्वस्त करत आहे. तर दुसरीकडे कांदिवली स्थानक पश्चिमेला देहविक्री व्यवसाय सर्रास सुरु आहे. कांदिवली परिसरात सुरु असलेला हा देहव्यापार बंद व्हावा, याकडे १० दहा हजार सह्यांची मोहिमही स्थानिकांनी राबवली होती. अनेकदा सामाजिक संस्थांनी याविरोधात आवाजही उठविला. तरीसुध्दा हा प्रश्न सुटू शकला नाही. कांदिवली परिसरात मोठ्या संख्येने बार आहेत, त्यामुळे या महिला बारभोवती, सार्वजनिक ठिकाणी रेंगाळत असायच्या. अनेकदा काही सामान्य महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे खासदार शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे. कांदिवली स्थानकांपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर कांदिवली पोलीस ठाणे आहे. या व्यवसायाची जाणीव पोलिसांना आहे, मग कारवाई का करत नाही, असा सवाल शेट्टींनी केला आहे. या महिलांना भावनिक आवाहन करत असताना नागरिकांना आणि त्यांच्यासोबत मला रस्त्यावर आंदोलनासाठी प्रवृत्त करु नका, असा इशाराही शेट्टींनी दिला होता. या आवाहनाला बार मालकांनी आणि स्थानिकांनी पाठिंबा दर्शवला आहे.