शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अन् बिग बी म्हणाले, हॅलो रितेश!

By admin | Updated: August 21, 2014 01:08 IST

समजा तुम्हाला फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने असे म्हटले की ‘मै अमिताभ बच्चन बोल राहा हूँ’ तर तुमचा विश्वासच बसणार नाही! कुणीतरी आपली मस्करी करत असल्याचे तुम्हाला वाटेल,

केबीसीचा पहिला जॅकपॉट नागपुरात : बक्षिसाच्या रकमेतून करणार बहिणीचे लग्ननागपूर : समजा तुम्हाला फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने असे म्हटले की ‘मै अमिताभ बच्चन बोल राहा हूँ’ तर तुमचा विश्वासच बसणार नाही! कुणीतरी आपली मस्करी करत असल्याचे तुम्हाला वाटेल, मात्र नागपूरच्या रितेशला खरचं अमिताभ बच्चनचा फोन आला आणि तो क्षण त्याच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरला. रितेश कुर्जेकर हा ‘कौन बनेगा करोडपती’ च्या या पर्वातील पहिला जॅकपॉट विजेता ठरला आहे. त्याला ‘घर बैठे जितो जॅकपॉट’ च्या माध्यमातून तब्बल तीन लाख रुपये बक्षिसाच्या रूपात घोषित झाले असून तो या पैशांतून आपल्या लहान बहिणीचे लग्न करणार आहे.नागपूरनजीकच्या मौदा येथील मूळचा रितेश धनराज कुर्जेकर सर्वसामान्य कुटुंबातला आहे. त्याचे वडील मौदा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. त्याची आई गृहिणी आहे. रितेशला दोन बहिणी आहेत. एकीचे लग्न झाले असून एक बहीण बी.एड. करीत आहे. रितेशला अधीपासूनच कौन बनेगा करोडपती (केबीसी)बद्दल आकर्षण होते. तो मागील तीन वर्षांपासून या शोच्या ‘घर बैठे जितो जॅकपॉट’ च्या प्रश्नांचे उत्तर एसएमएस करीत असे. शेवटी २५ जुलैला रितेशला सोनी वाहिनीकडून फोन आला. रितेश तुम्ही ‘घर बैठे जितो जॅकपॉट’ च्या विजेत्यांच्या यादीत आले आहात, असा संदेश त्याला देण्यात आला. दुसऱ्या दिवशी परत सकाळी १० वाजता रितेशला फोन आला. असे तीन चार फोन रितेशला आलेत. शेवटी आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत तुम्हाला फोन येऊ शकतो, असे सांगण्यात आले. अखेर रात्री ९:३० वाजता फोन आला. हॅलो रितेश... तो म्हणाला हा...‘‘मै अमिताभ बच्चन बोल राहा हू कोैन बनेगा महाकरोडपती से...तेव्हा रितेशला धक्का बसला. ‘च्या आयला अमिताभ’ असे शब्द त्याच्या तोंडून निघाले. रितेश म्हणाला ‘‘माय गॉड आय कान्ट बिलिव्ह इट सर..इट्स माय प्लेझर टू हियर यू. तेव्हा अमिताभ म्हणाले ‘‘अभी तो हम मिले नही है, मिलेंगे तब खुश होना. रितेश आप एक लाख रुपये जिते हो आपका आभिनंदन! क्या आप तीन लाख के लिए खेलना चाहोगे’’...तेव्हा मी खेळणार नव्हतो मात्र माझ्या बहिणीने आग्रह केला आणि मी हो म्हणालो...अभिताभ यांनी मला प्रश्न विचारला की यापैकी ‘कोणते शहर दोन राज्यांची राजधानी आहे’ व आॅप्शन वाचून दाखविले. तेव्हा मी लगेचच हैदराबाद असे उत्तर दिले. सही जवाब म्हणत टाळ्याचा आवाज आला. अन् फोन कट झाला. बस तो आवाज आज देखील माझ्या कानात गुंजत आहे. मला आज देखील विश्वास बसत नाही की मी अमिताभ बच्चनसोबत बोललो. मात्र एक लाखावर जे अधिकचे दोन लाख रुपये जिंकलो. ते माझ्या बहिणीच्या पाठिंब्यामुळे तेव्हा ही रक्कम मी माझ्या लहान बहिणीच्या लग्नासाठी ठेवणार असल्याचे रितेशने लोकमतशी बोलताना सांगितले. आता रितेशला ‘हॉट सिट’वर बसायचे असून त्याची तयारी म्हणून की काय तो आता स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. त्याला आयबीपीएसची परीक्षा देऊन आयटी आॅफिसर व्हायचे आहे.(प्रतिनिधी)असे वाटते की सेलिब्रिटी झालो१८ आॅगस्टला माझा अमिताभसोबत झालेला संवाद साऱ्या जगाने ऐकला त्यानंतर मला मोठ्या प्रमाणावर फोन कॉल सुरू झाले. अनेक जुन्या मित्रांशी बोलणे झाले. अभिनंदनाचा वर्षाव माझ्या फेसबुक वॉल वर करण्यात आला. शेकडो फ्रेन्ड रिक्वेस्ट आल्या आहेत. गावात येता जाता लोक मला हात दाखवून विचारपूस करतात. ‘अरे हाच तो रितेश’ असे शब्द देखील कानावर पडतात. असे वाटते जणू मी सेलिब्रिटी झालो आहे.