शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई देवीवंदना रूपात

By admin | Updated: September 26, 2014 18:45 IST

शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची देवीवंदना रूपात पूजा बांधण्यात आली; तर पालखी मंडप आकारात काढण्यात आली.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची देवीवंदना रूपात पूजा बांधण्यात आली; तर पालखी मंडप आकारात काढण्यात आली. शुक्रवार हा देवीचा वार असल्याने आज अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती. 
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या दिवशी दुपारच्या आरतीनंतर देवीची देवीवंदना रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा ‘करवीर माहात्म्य’ ग्रंथातील संदर्भानुसार असून, ती गुरू मुनीश्‍वर व रवी माईनकर यांनी बांधली. श्री करवीर निवासिनी अंबाबाई ही जगदाद्यशक्ती असून, विश्‍वाचे सार्मथ्य तिच्या ठायी एकवटले आहे. म्हणून या देवीची इंद्राने अहिल्येच्या अपहाराच्या पातकातून आपली मुक्ती व्हावी यासाठी आराधना केली. पराशर ऋषींच्या तपात विघ्न आणू पाहणार्‍या नागांचे दुष्टत्व याच करवीराची यात्रा करताना नष्ट झाले. विनितापुत्र गरुड हे विष्णूचे वाहन. नागांशी असलेले वैर विसरून तो या करवीरात एक देवीभक्त म्हणून देवीसमोर हातात नाग धरून उभा राहिला आहे. व्यासांच्या जन्मापूर्वी लोकोद्धाराची भावना मनात ठेवून ऋषी पराशर आणि त्यांची पत्नी सत्यवती यांनी पन्हाळ्यावर तप केले. तपपूर्तीवेळी देवीने त्यांना दर्शन देऊन त्यांच्या मनातील विष्णू व देवी यांच्यातील भेद दूर केला आणि व्यासांसारखा लोकोद्धारक पुत्र होईल, असा त्यांना आशीर्वाद दिला.