शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकांसाठी युती; दानवे यांची घोषणा

By admin | Updated: March 26, 2015 01:49 IST

औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.

मुंबई : विधानसभा निवडणूक परस्परांविरुद्ध लढणाऱ्या शिवसेना-भारतीय जनता पार्टीने औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेनेतील वाद विकोपाला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दोन्ही महापालिका निवडणुकीत युती करण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानुसार आज दानवे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली. वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांना भाजपाचा पाठिंबा असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असून नवी मुंबई महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्याकरिता निवडणुकीत युती होणे ही दोन्ही पक्षांची गरज आहे. मात्र जागावाटप हा युती आकाराला येण्यातील मुख्य अडसर असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते खासगीत मान्य करीत आहेत. भाजपा-शिवसेनेतील वरचेवर होणाऱ्या वादाबाबत विचारले असता दानवे म्हणाले की, दोन्ही पक्षांचा मोठा संसार आहे. जेथे दोन लोक राहतात तेथे सुरुवातीला काही ना काही होत असते. मात्र युतीत सर्व काही आलबेल आहे. (विशेष प्रतिनिधी)