शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

'युती'च्या मंत्र्यांचा शुक्रवारी शपथविधी

By admin | Updated: December 3, 2014 16:16 IST

विरोधीपक्षांच्या बाकावर बसलेली शिवसेना सत्तेत सहभागी होत असून शुक्रवारी होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेचे १२ तर भाजपाचे १० मंत्री शपथ घेणार आहेत.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३ - विरोधीपक्षांच्या बाकावर बसलेली शिवसेना सत्तेत सहभागी होत असून शुक्रवारी होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेचे १२ तर भाजपाचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. राज्यात यावेळी केवळ भाजपाचे सरकार नसून शिवसेना-भाजपाचे अर्थात युतीचे सरकार अस्तित्वात येणार आहे. 
शुक्रवारी सकाळी १० वाजता विधानभवनांच्या प्रांगणात शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. येत्या ८ डिसेंबरपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, त्यापूर्वी मंत्रिमंडळचा विस्तार करण्यात येत आहे. मुंबईतील विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱया कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव मंत्र्यांना पद आणि गोपनयीतेची शपथ देतील. शिवसेनेच्या पारडयात भाजप कोणती खाती टाकणार हे सध्या गुलदस्त्यात असले तरी महत्वाचे गृह, अर्थ, महसूल ही खाती देण्यास भाजपाने सेनेला आधीच नकार दिला आहे. शिवसेनेतून आता मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागते याची सर्वांना उत्सुकता असून कॅबिनेट मंत्रीपदासाठी सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांची नावे चर्चेत आहेत. तर राज्यमंत्री पदासाठी दादा भुसे, विजय आवटी, रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर किंवा उदय सामंत, दीपक सावंत यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.  दरम्यान, लोकसभेपाठोपाठ राज्याच्या विधानसभेतही कॉंग्रेस विरोधी पक्षनेतेपदाला मुकणार का, अशी शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचे जवळपास निश्चित झाले असून, या स्थितीत संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे येऊ शकते. मात्र विधीमंडळाच्या गेल्या अधिवेशनात कॉंग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून त्यांना विरोधीपक्षनेतेपदालाही मुकावे लागेल का, अशी शक्यता निर्माण झाली आहे.